हिंगोली : नरसी नामदेव येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची मानाची पालखी नरसी येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाली. मंगळवारी सायंकाळी हिंगोली शहरातीत दहा अश्वांसह पालखी दाखल झाली. वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर करत रामलीला मैदान गाठले. मैदानावर रिंगण सोहळा रंगला. सारे शहर विठूमय झाले.

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव हे जन्मस्थळ असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी सोमवारी सायंकाळी नरसीत ग्राम प्रदक्षिणा घालून नामदेवाच्या जन्मस्थळी मुक्कामी थांबली होती. मंगळवारी सकाळी नरसी येथून विठू नामाचा गजर करत पालखी सायंकाळी हिंगोलीत पोहोचली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलग ३० वर्षांपासून नामदेव महाराजांची पालखी अविरतपणे पंढरपूरी जाते. हिंगोली शहरात दिंडी पालखी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या गजरात आगमन झाल्यानंतर नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सदस्य मनोज आखरे, द्वारकादास सारडा, मनीष साकळे, बाळू बांगर यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. अश्व रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. रामलीला मैदानावर हरिनामाचा गजर करीत भाविकांनी फुगड्या खेळल्या. रिंगण साेहळ्यानंतर हिंगोलीतून पालखीचे औंढा नागनाथकडे प्रस्थान झाले.