केंद्रीयमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना आज जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या विशेष सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंडे यांनी राजकीय व सामाजिक जीवनात संघर्ष करून मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. त्यांची जनसेवा सर्वाना मार्गदर्शक असल्याची भावना या वेळी विविध वक्त्यांनी व्यक्त केली.
जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. लंघे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, सभापती हर्षदा काकडे, राष्ट्रवादीचे गटनेते शरद नवले, सदस्य बाळासाहेब हराळ, बाजीराव गवारे, दत्तात्रेय सदाफुले, रावसाहेब साबळे, बाबासाहेब दिघे, अशोक अहुजा, अश्विनी भालदंड, श्रीरामपूरच्या सभापती सुनीता बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे तसेच कर्मचा-यांनी आपल्या भाषणातून मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2014 रोजी प्रकाशित
जिल्हा परिषदेत मुंडे यांना श्रद्धांजली
केंद्रीयमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना आज जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या विशेष सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंडे यांनी राजकीय व सामाजिक जीवनात संघर्ष करून मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. त्यांची जनसेवा सर्वाना मार्गदर्शक असल्याची भावना या वेळी विविध वक्त्यांनी व्यक्त केली.
First published on: 06-06-2014 at 03:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homage to gopinath munde in zp