राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”आज माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.” असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

२१ टक्क्यांहून अधिक जणांना यापूर्वीच करोनाची लागण

दरम्यान, देशातील १० वर्षे अथवा त्याहून अधिक वयोगटातील २१ टक्क्यांहून अधिक जणांना यापूर्वीच कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे आयसीएमआरने अलीकडेच केलेल्या सीरो सर्वेक्षणात म्हटले आहे, असे गुरुवारी सरकारने जाहीर केले. त्याचप्रमाणे करोनाची सहज लागण होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister anil deshmukh corona positve msr
First published on: 05-02-2021 at 19:52 IST