राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २१ ते ६५ या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार तसेच कुटुंबातील फक्त एकच अविवाहित महिलेला प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोई- सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना आत्मनिर्भर करणे, महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी महिला याचा लाभ घेत आहेत.

तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल आणि ऑनलाइन अर्ज करण्याचा विचार करत असाल तर त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया –

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा
  • तिथे ‘लॉग इन’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुम्ही आधीच अकाउंट तयार केले असेल तर लॉग इन करा
  • नसेल, तर ‘क्रिएट न्यू अकाउंट’वर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज भरा आणि ‘साइन अप’ बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड हे तपशील भरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटवर लॉग इन करा.
  • तिथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज’वर क्लिक करा.
  • तिथे सर्वात आधी तुमचा आधार क्रमांक भरा आणि नंतर ‘सबमिट’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर तिथे जे तपशील भरायला आहेत, ते अचूक भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा ‘सबमिट’वर क्लिक करा.
  • ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला अॅप्लिकेशन नंबरचा एसएमएस येईल.

तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल आणि ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्हाला अर्ज करता येईल. अर्ज केल्यानंतर त्याची स्थिती कशी तपासायची, त्याबद्दलही जाणून घेऊयात.

अर्जाची स्थिती कशी तपासायची?

तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ऑनलाइन अर्जाची स्थिती तुमच्या मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा वापरून योजनेच्या वेबसाइटवर लॉग इन करून तपासू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या महानगरपालिकेच्या वेबसाइटला भेट देऊनही स्थिती तपासू शकता.

लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया:

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या-
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ च्या अधिकृत वेबसाइटवर ladkibahin.maharashtra.gov.in जा.

२. लॉगिन करा –
तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड वापरून पोर्टलवर लॉग इन करा.

३. अर्जाची स्थिती तपासा –

‘माझे अर्ज’ किंवा ‘अर्जाची स्थिती’ या पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्थिती तपासा.

४. महानगरपालिकेची वेबसाइट –
तुमच्या महानगरपालिकेच्या वेबसाइटला भेट देऊनही लाडकी बहीण योजनेची यादी किंवा अर्जाची स्थिती तपासू शकता, अशी माहिती क्लियर टॅक्सने दिली आहे.

इतर पर्याय:

एसएमएस –
तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल एसएमएसद्वारे माहिती मिळू शकते.

लाभार्थी यादी-
योजनेच्या वेबसाइटवर ‘लाभार्थी यादी’ किंवा ‘निवडलेल्या अर्जदारांची यादी’ तपासू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही यापैकी कोणतीही पद्धत वापरून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.