HSC Result Sindhudurg: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ९६.०८ टक्के निकाल नोंदवत अव्वल स्थान पटकावले आहे.

यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.६७ टक्के लागला, तर कोकण बोर्डाने ९६.०८ टक्के निकाल नोंदवत सलग १४ व्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालाची आकडेवारी देखील लक्षणीय आहे. दोडामार्ग तालुक्याने १०० टक्के निकालासह प्रथम स्थान मिळवले आहे. त्यापाठोपाठ वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.५८ टक्के, वैभववाडी तालुका ९९.५९ टक्के, मालवण तालुका ९९.३६ टक्के, कणकवली तालुका ९९.२२ टक्के, कुडाळ तालुका ९८.९० टक्के, देवगड तालुका ९८.९९ टक्के आणि सावंतवाडी तालुका ९८.४० टक्के इतका लागला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण ८ हजार २६६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती, ज्यापैकी ७ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ९६.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ९७.२७ टक्के तर मुलांचे प्रमाण ९५.४२ टक्के आहे.