scorecardresearch

Premium

“माझी भूमिका घेऊन मी निघालो, पक्षाचा मला…”, छगन भुजबळांच्या ओबीसी समर्थनाला पक्षाचा पाठिंबा?

छगन भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावरून विरोध दर्शवला आहे. यासाठी त्यांनी ओबीसी एल्गारही पुकारला. परंतु, त्यांच्या या भूमिकेला अजित पवार गटाचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारण्यात येतोय.

Chhagan Bhujbal on OBC
छगन भुजबळ काय म्हणाले? (फोटो – छगन भुजबळ फेसबूक)

एका बाजूला मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली सर्व शक्ती पणाला लावत असताना, त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून ओबीसींमधून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी खुले आव्हान दिले आहे. तसंच, त्यांना पक्षाचा पाठिंबा आहे की नाही याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही.

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊऩ आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आक्रमकपणे उभे राहिले आहेत. आपली ही आक्रमकता सरकारलाही आव्हान देणारी नाही का, असे भुजबळ यांना विचारले असता, सरकारने सरकारसारखे वागले पाहिजे. कायदा वगैरे काही आहे की नाही? आमच्या सभा रात्री १० वाजता बंद केल्या जातात, त्यांना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, हे बरोबर नाही, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

devendra fadnavis obc protest withdraw
ओबीसी आंदोलन मागे; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका आहे, पण…”
rohit pawar
मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई, दोन नेत्यांवर आरोप करत म्हणाले…
KC Venugopal
“संसदेच्या जुन्या वास्तूत दोष होता?” महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न
Rohit pawar (2)
“ओबीसींना राजकीय आरक्षण नको म्हणून भाजपाचे पदाधिकारी कोर्टात गेले”, रोहित पवारांचा गंभीर आरोप

हेही वाचा >> भुजबळांमागे कुणाचे ‘बळ’? मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना खुले आव्हान

“मी आधी आक्रमक झालो नाही; परंतु त्यांनी गावबंदी करायची, लोकांची घरे जाळायची, पोलिसांना जखमी करायचे, आम्ही गप्प बसावे का, असा सवाल त्यांनी केला. माझी भूमिका मी घेऊन निघालो आहे, पक्षाचा मला पाठिंबा आहे की नाही याचा मी विचार करीत नाही”, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I left with my stance the partys me partys support for chhagan bhujbals obc support sgk

First published on: 20-11-2023 at 11:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×