पुरोहितांची, मंत्रांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसह मी स्टेजवर बसणार नाही अशी भूमिका मी घेतली होती असं मेधा कुलकर्णींनी सांगितलं. बारामतीत एक कार्यक्रम होता. त्या सभेत अमोल मिटकरी येणार होते. मी त्यांच्यासह स्टेजवर बसायला नकार दिला. वेळ प्रसंगी आपल्याला भूमिका घेता आली पाहिजे असं मेधा कुलकर्णींनी सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?

“अमोल मिटकरी हे बारामतीतल्या एका कार्यक्रमात स्टेजवर येणार होते. मी त्या स्टेजवर जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर अमोल मिटकरी त्या सभेला आलेच नाहीत. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीची म्हणा, पण उगाच काही ऐकून घेणार नाही.” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही

“ब्राह्मण समाज अतिशय साधा आहे. मात्र विनाकारण कुणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचं नाही. पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्ट करणारे अमोल मिटकरी व्यासपीठावर येणार आहेत हे समजल्यावर मी ठाम भूमिका घेतली” असं त्यांनी स्पष्ट केलं.

सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सत्कार मेधा कुलकर्णींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आणि अमोल मिटकरींबाबत काय भूमिका घेतली तेदेखील सांगितलं.

हे पण वाचा- बालभारती-पौड रस्त्यावरून खासदार मेधा कुलकर्णी आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात वादाची ठिणगी?

विनाकारण कोणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचे नाही. त्यामुळेच पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्टा करणारे आमदार अमोल मिटकरी ज्या व्यासपीठावर असतील त्या व्यासपीठावर मी जाणार नाही, असा पवित्रा आपण घेतल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते, त्या स्टेजवर मी येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर मिटकरीच त्या सभेला आलेच नाहीत. त्यामुळे जे चुकीचे आहे, त्याला चुकीचे म्हणा, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातल्या सगळ्या हिंदूंना एकत्र करायचं आहे

देशातील सगळ्या हिंदूंना एकत्र करायचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठीच्या कामासाठी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले. ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या. ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. त्यांच्यावर विविध कारणातून टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका व नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा, असे आवाहन खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले. यावेळी श्रीमंत पुष्कर सिंह पेशवे, युवराज श्रीमंत आदित्य राजे विजयसिंह पटवर्धन ,श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, राज लक्ष्मी राजे पटवर्धन आदींची उपस्थिती होती.