शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना विविध मुद्य्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सध्या देशात नोटांवर कोणत्या महापुरुषांचे फोटो पाहिजेत यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही आपलं मत व्यक्त केलं.

हेही वाचा : ५० खोक्यांवरून होणाऱ्या टीकेबद्दल बच्चू कडूंनी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

परब म्हणाले, “ नोटेवर फोटो कोणता हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या भानगडीत शिवसेना जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तर असंच वाटेल की बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही. शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्यावर काय असायला पाहिजे, हे जाणूनबुजून निर्माण केलेले वाद आहेत.”

हेही वाचा : “सण साजरे करून किंवा भेटी जर संपल्या असतील तर …” – सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

याशिवाय “या गोष्टींवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे की, आपला रुपया घरसतोय. निर्मला सीतारामन यांनी यावर असं सांगितलय की, रुपया घसरत नाहीए डॉलर मजबुत होतोय. यावर आपण बघताय व्हॉट्स अॅपवर बरेचसे मेसेज फिरत आहेत. विविध पद्धतीने त्यावर टीका होते आहे. परंतु आपल्या देशाचं मूल्यमापन हे आपल्या रुपयावरती अवलंबून असतं आणि तो केवळ रुपया घसरत नाही तर देश घसरतोय. त्यामुळे सरकारने याची काळजी घेतली पाहजे असं एक सर्वसाधरण नागरिक म्हणून, करदाता म्हणून मला वाटतं.” असंही परब यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा – MCD election : “दिल्लीत एकही भाजपावाला राहणार नाही, सर्वांचं….”; अरविंद केजरीवालांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दोन दिवसांपासून भारतातील चलनी नोटा आणि त्यांच्यावर असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो यावरून बराच वाद सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका मागणीमुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली. मुळात केजरीवाल यांनी ही मागणी गांभीर्याने केली नसून मोदी सरकारवर खोचक शब्दांत टोला लगावण्यासाठी त्यांनी या मागणीचा वापर केला. मात्र, त्यानंतर भारतीय चलनी नोटांवर गांधीजींऐवजी अजून कुणाकुणाचे फोटो असायला हवेत, याची अहमहमिकाच राजकीय नेतेमंडळींमध्ये लागली. मग देवी-देवतांच्या फोटोंपासून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोपर्यंत हा वाद येऊन पोहोचला आहे.