बियर बार, वाईन शॉप व देशीदारूचे एकूण १०४ प्रस्ताव पडून
मंदिर, मस्जीद, शाळा परिसरात देण्यात आलेले बियर शॉपी, देशी दारू व वाईन शॉपचे परवाने तात्काळ रद्द करावे असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. नव्याने बियर शॉपी देवू नये, जिल्हा प्रशासनाकडे बियर बार, वाईन शॉप व देशीदारूचे एकूण १०४ प्रस्ताव पडून आहेत. आगामी निवडणुका बघता सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, दंगल होणार नाही या सर्व गोष्टी लक्षात घेवूनच टप्या टप्याने मंजूरी दिली जाईल अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. दारू दुकानांवरून राजकीय फायद्यासाठी काही मंडळी राजकारण करित असल्याचेही ते म्हणाले.

नियोजन भवनात आयोजित पत्रपरिषदेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात दारू दुकानांवरून राजकारण सुरू असल्याचे सांगितले. राजकारण सुरू असले तरी सर्व नियम पाळूनच आता दुकानांना मंजूरी द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाला दिल्याचे सांगितले. उत्पादन शुल्क विभागाने मंदिर, मस्जीद, शाळा व बाल रूग्णालयाचे बाजूला बियर शॉपी व देशी दारू दुकानांचे परवाने मंजूर केले आहेत. या सर्व ठिकाणचे परवाने रद्द करावे असे निर्देश दिल्याची माहिती दिली. दारूबंदीपूर्वी या जिल्ह्यात ४० बियर शॉपी होत्या. आता एक वर्षे झाले दारूबंदी उठली आहे. या एक वर्षेमध्ये ३५ बियर शॉपीला परवानगी दिली आहे. भविष्यात नव्याने बियर शॉपी देवू नये अशा स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांच्याकडे बियर बार, देशी दारू व वाईन शॉपचे एकूण १०४ प्रस्ताव पडून आहेत. आगामी काळात निवडणुका आहेत. विरोधकांनी आतापासूनच दारूच्या मुद्यावरून राजकारण करायला सुरूवात केली आहे. राजकीय फायद्यासाठीच हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दारू विक्रीला उधान आले असेही आरोप होत आहेत. मात्र ही वस्तुस्थिती नाही. निवडणुकांमध्ये सामाजिक स्वास्थ बिघडू नये , दंगली घडू नयेत म्हणूनच १०४ प्रस्ताव थांबवून ठेवले आहेत. सर्व गोष्टी विचारात घेवून व सर्व तपासूनच टप्या टप्याने या नविन प्रस्तावांना मंजूरी दिली जाईल अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान

बाबुपेठ उड्डाणपुलासाठी पाच कोटी देण्याचे निर्देश
बाबुपेठ उड्डाणपुलाचे श्रेय लाटण्यासाठी सध्या स्पर्धा सुरू आहे. मात्र बाबुपेठ उड्डाणपुलाला राज्यातील महाविकास आघाडीने ५ कोटी २६ लाखाचा निधी दिला आहे. वाढीव निधी देण्याचे कामही राज्य सरकारच करित आहे. महानगरपालिकेत पाच वर्षे सत्ता असतांना भाजपाने पाच कोटीचा निधी दिला नाही. मात्र आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना महापालिकेच्या वाट्याला आलेले पाच कोटी तात्काळ देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त मोहिते यांनीही पाच कोटीचा निधी पालिकेकडे आहे, तेव्हा तात्काळ धनादेश देतो असे सांगितल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. ज्यांना बाबुपेठ उड्डाणपुलावरून राजकारण करायचे आहे त्यांनी करावे, आम्ही केवळ काम करणार असेही ते म्हणाले.