अलिबाग : कर्जत विधानसभेच्‍या जागेसाठी राष्‍ट्रवादी कडून तयारी सुरू झाल्‍याने विद्यमान आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे आक्रमक झाले आहेत. असे असले तरी राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्‍यक्ष सुनील तटकरे यांनी या मतदारसंघावरील दावा नाकारला नाही. त्‍या संदर्भातील निर्णय मुख्‍यमंत्री, दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री मी स्‍वतः प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून एकत्रित बसून घेवू असं स्‍पष्‍ट करतानाच सुनील तटकरे यांनी या मतदारसंघावर राष्‍ट्रवादी काँग्रेसचा दावा अद्यापही असल्‍याचे संकेत दिले.

आज सुतारवाडी येथील निवासस्‍थानी ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणूकीत रायगड लोकसभा मतदार संघातील सर्वच विधानसभा मतदार संघात महायुतीमधील घटक पक्षांनी एकत्रितपणे काम केलं. त्‍याची परीणिती मोठे मताधिक्‍य लोकसभेत मिळालं. इथल्‍या सर्वच मतदार संघात राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे महायुतीचे काम करील. राहता राहिला प्रश्‍न कर्जतचा तेथे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे इच्‍छुक आहेत. राज्‍यात असे अनेक राष्‍ट्रवादीचेही मतदारसंघ आहेत जेथे शिवसेनेचे नेते इच्‍छुक आहेत. परंतु त्‍या संदर्भातील निर्णय मुख्‍यमंत्री, दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री, मी स्‍वतः प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून एकत्रित बसून घेवू असं सुनील तटकरे यांनी स्‍पष्‍ट केले.

Sanjay Raut, Harshvardhan Patil
Sanjay Raut : “हर्षवर्धन पाटील शांत झोपेसाठी भाजपात गेलेले, आता मविआत आल्यावर…”, संजय राऊतांची कोपरखळी
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Jitendra Awhad On Ajit Pawar
Jitendra Awhad : “पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेल्या…”; जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडीओ शेअर करत अजित पवारांवर हल्लाबोल
guhagar assembly constituency marathi news
Guhagar Assembly Constituency: भास्कर जाधवांना महायुतीकडून कोण आव्हान देणार?
Vijay Wadettiwar On Tekchand Sawarkar
Vijay Wadettiwar : “लाडकी बहीण कमळाला मत देईल, म्हणून हा जुगाड”; भाजपा आमदाराचं वक्तव्य, वडेट्टीवारांनी शेअर केला व्हिडीओ
Chiplun sharad pawar marathi news
“चिपळूणसारखे खराब रस्ते महाराष्ट्रात कुठेच नाही”, कुंभार्ली घाटातून प्रवास करताना शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी
Devendra Fadnavis Political Future
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय? दिल्ली की महाराष्ट्र? भाजपासमोर यक्ष प्रश्न
satyapal malik meets uddhav thackeray at matoshree
Satyapal Malik: विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका

हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : किरीट सोमय्यांनी पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “दिलेली जबाबदारी…”

जर कर्जतमध्‍ये लुडबुड केली तर आम्‍ही श्रीवर्धनमध्‍ये प्रमोद घोसाळकर यांना उभे करू असा इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला होता. खुद्द प्रमोद घोसाळकर यांनीही तशी तयारी दर्शवली आहे. यावर बोलताना सुनील तटकरे म्‍हणाले की श्रीवर्धनबाबत कुणी वायफळ बडबड करत असेल तर त्‍यांची नोंद त्‍यांचे नेते भरत गोगावले, महेंद्र दळवी, योगेश कदम घेतील. अशा किरकोळ माणसांच्‍या तयारीबद्दल मला बालायचे नाही. वक्‍तव्‍याची दखल घेण्‍याच्‍या क्षमतेचे नाहीत त्‍याबददल मला अवाक्षर बोलायचे नाही असा टोला तटकरे यांनी शिवसेना जिल्‍हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांना लगावला. महाड, पेण, अलिबाग, दापोली या सर्व मतदार संघात युतीचा धर्म पाळून माझ्याकडून पूर्ण ताकदीने काम केले जाईल, असेही तटकरे यांनी स्‍पष्‍ट केले.