अलिबाग: रोह्यातील साधना नायट्रोकेम कंपनीत सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्फोट झाला. ज्यात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रोह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील या रासायनिक कंपनीतील ओडीबीटू प्लांट मधील मिथेनॉल साठवण टाकीवर वेल्डींगचे काम सुरू होते. एम. के. फॅब्रिकेटर ठेकेदार कंपनीचे सहा कामगार या ठिकाणी उपस्थित होते. काम सुरु असतांनाच अचानक साठवण टाकीचा स्फोट झाला.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्यात दोन कामगारांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रोहा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल, पोलीस आणि महसुल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.