सांगली : खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये उरूसातील बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. रोहन राजेंद्र घोरपडे (वय २३) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. उरूसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला.

हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे इंजिन, तर राहुल गांधी यांच्या ट्रेनला…”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहनला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. वाळूज गावात पिराचा उरूस सुरु असून खडी येथे बैलगाडे पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. या परंपरेंनुसार बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र यातीलच एक बैलगाडा धावत असताना थेट बैलगाडा शर्यत बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडे पळत असताना तो पाय घसरून पडला आणि नेमके त्याच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले. यादुर्घटनेत तरुणाचा मृत्यू झाला.