सांगली : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम करायचा नाही, जर केला तर उधळून लावण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पालकमंत्री सुरेश खाडे यांना दिला. तत्पुर्वी मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे त्यांचे वाहन अडवून घेराव घालण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आज पालकमंत्री खाडे हे सांगलीहून मिरजेतील कार्यालयाकडे येत असताना अचानक आडवे आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोटारीचा ताफा अडवला. जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. यामुळे पोलीसांची मात्र तारांबळ उडाली.

आंदोलक कार्यकर्त्यांना मंत्री खाडे यांनी सामोरे जात आपल्या भावनांशी मी सहमत असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत आपण मराठा आरक्षणाबाबत काय केले अशी विचारणा केली. येत्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबतचा मुद्दा प्रकर्षाने मांडून तडीस लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन खाडे यांनी यावेळी दिले. गावोगावी राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात येत असून याची आपणाला जाणीव आहे, ही बाब मी मंत्रीमंडळ बैठकीत सांगतो, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी

हेही वाचा : गडकरी म्हणतात, ‘शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे…’

मात्र, यापुढे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळेपर्यंत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, जर तसे आढळले तर कार्यक्रम उधळून लावले जातील असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनामध्ये विलास देसाई, संतोष माने, विजय धुमाळ, तानाजी भोसले, राजू चव्हाण, प्रशांत चव्हाण, विक्रम पाटील, अक्षय मिसाळ आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.