सांगली : जागतिक स्तरावर ‘यलो सिटी’ अशी ओळख पुन्हा एकदा सिद्ध करत सांगली बाजारात हळदीला क्विंटलला ४१ हजार १०१ रूपयांचा दर मंगळवारच्या सौद्यामध्ये मिळाला. सांगलीतील हळद बाजाराच्या इतिहासात हा सर्वोच्च दर आहे. सध्या नवीन हंगामातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून प्रामुख्याने राजापुरी हळदीची आवक आहे. मंगळवारी विजयकुमार आमगोंडा पाटील मजलेकर यांच्या अडत दुकानामध्ये काढण्यात आलेल्या हळद सौद्यामध्ये कर्नाटकातील सायबान भूपती पुजारी (रा. कोहळी ता. अथणी) या शेतकर्‍यांच्या हळदीला ४१ हजार १०१ रूपये प्रति क्विंटलने मागणी झाली. श्रीकृष्ण कार्पोरेशनने ही हळद उच्चांकी दराने खरेदी केली.

हेही वाचा : “महाराष्ट्रातली महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा..” , अमित शाह यांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सांगली बाजारात विक्रीसाठी १२ हजार ९०० क्विंटल हळदीची आवक झाली असून आतापर्यंत ९ लाख ७ हजार ११४ क्विंटल आवक झाली असल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले. आज झालेल्या सौद्यामध्ये हळदीला किमान १२ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून प्रतवारीनुसार सरासरी दर २७ हजार रूपये आहे. यंदा हळदीला दर चांगला मिळत असून उच्चाकी दराचा फायदा हळद उत्पादक शेतकर्‍यांना होत असल्याचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी सांगितले.