सोलापूर : उन्हाळी हंगामात गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटून गावाकडे परत निघालेल्या दाम्पत्याची सशस्त्र चोरट्यांनी वाटमारी करून दोन तोळे सोन्याचे दागिने लुटले. मिरज-सांगोला रस्त्यावर पाचेगाव (ता. सांगोला) येथे पहाटे हा प्रकार घडला. बाबासाहेब मल्हारी जगताप (वय ३७, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) हे आपल्या पत्नीसह गोव्याची सफर करून कोल्हापूर मार्गे सोलापूरकडे परत येत होते. मिरज-सांगोला दरम्यान पाचेगावात उड्डाणपुलाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास लघुशंकेसाठी बाबासाहेब जगताप हे आपल्या मोटारीतून उतरले.

हेही वाचा : सोलापूर : हातउसने दिलेली रक्कम परत न केल्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा चार सशस्त्र चोरट्यांनी जगताप दाम्पत्याला घेरले आणि लोखंडी सळई, पहार आदी हत्याराचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. जगताप दाम्पत्याच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने लुटून चोरटे पसार झाले. लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत ९७ हजार रूपये एवढी दर्शविण्यात आली आहे. चोरट्यांचा सांगोला पोलीस शोध घेत आहेत.