सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मतदान झालेल्या पैकी  ४८.८९ टक्के मतदान झाले आहे. तर त्याचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे संजयकाका पाटील यांना  ४०.३३ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली. सांगली मतदार संघात ७ मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी पार पडली. निवडणुकीच्या मैदानात भाजप, उबाठा शिवसेना यासह अपक्ष असे एकूण २० उमेदवार रिंगणात होते. यापैकी खरी लढत भाजप विरूध्द अपक्षच झाली.

हेही वाचा >>> “मी एकटा पडलो”, पराभवानंतर चंद्रकांत खैरेंचं विधान; म्हणाले, “काही लोकांवर संशय, उद्धव ठाकरेंकडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी ५ लाख ७१ हजार ६६६ मते घेउन विजय संपादन केला. एकूण ११ लाख ६९ हजार ३२० मतदान झाले. यापैकी ४८.८९ टक्के मते त्यांना मिळाली तर भाजपचे पाटील यांना ४०.३३ टक्के मतदारांनी मत दिले. निवडणुकीत महाविकास आघाडीतून उभे असलेले उबाठा शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना ५.२० टक्के म्हणजेच ६० हजार ३६० मतदारांनी मत दिले. बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश शेंडगे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती, त्यांना केवळ ८ हजार २५१ मते मिळाली. निवडणुकीत उतरलेल्या २० पैकी १८ जणांना आपली अनामत गमावावी लागली.