हिवताप निदान आणि निर्मूलनासंदर्भातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) विद्यार्थ्यांनी के लेले संशोधन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे. आंतररराष्ट्रीय पातळीवरील इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशिन (आयजीइएम) स्पर्धेतील पदवीपूर्व गटात आयसर पुणेच्या संघाने ही कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या जगातील प्रश्न सोडवण्यासाठीच्या दृष्टीने सिंथेटिक बायोलॉजीचा वापर करण्यासाठी इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर मशिन (आयजीइएम) हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग दिला जातो. जगभरातील २५० संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत आयसर पुणेतील पदवीपूर्व स्तरावरील चिन्मय पटवर्धन, अब्दुल रिशाद, अक्षय कुन्नाविल, अलीना जोस, अनंता एस. राव, अँथोनी किरण डेविड, अवधूत जाधव, गुणवंत पाटील, जतीन बेदी, मेरीन विन्सेंट, मिसाल बेदी, रुपल गेहलोत, शैलेश चिन्नराज या १४ विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता.

आयसर पुणेच्या संघाने या स्पर्धेत हिवतापासंदर्भातील संशोधनामध्ये हिवतापाच्या निदानासाठी कार्यक्षम आणि स्वस्त निदान संच विकसित के ला. सॉफ्टवेअरवर आधारित निदान संचाची अचूकता ९५.४५ टक्के आहे. तसेच हिवताप निर्मूलनासाठी तोंडावाटे देण्यासाठीच्या प्रथिन साखळीचा शोध आयसर पुणेच्या युवा संशोधकांनी लावला आहे.

आयजीइएम स्पर्धेत मिळालेले यश अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. कारण ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. त्यात जगभरातील नामांकित विद्यापीठांतील विद्यार्थी सहभागी होतात. विद्यार्थ्यांनी करोना संसर्गाच्या आव्हानात्मक काळात संशोधन के ले ही महत्त्वाची बाब आहे. या पूर्वी या स्पर्धेत रौप्यपदक आणि कांस्य पदक मिळाले होते. पण सुवर्णपदक मिळवण्याची पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी पुढे आणखी संधी आहेत.  – डॉ. संजीव गलांडे, अधिष्ठाता, संशोधन आणि विकास विभाग, आयसर पुणे</strong>

स्पर्धेसाठी जानेवारीपासून हे संशोधन सुरू होते. करोना संसर्ग आणि टाळेबंदीमुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे संशोधन प्रकल्पाच्या नियोजनात बदल करावे लागले. स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याचा खूप आनंद आहे. आता हे संशोधन आणखी पुढे नेण्याचा मानस आहे.   – चिन्मय पटवर्धन, संशोधक चमूचा प्रमुख

सर्वोत्तम प्रकल्पाचेही पारितोषिक

संशोधन सर्वोत्तम ठरण्यासह आयसर पुणे सर्वोत्तम प्रकल्पाचेही पारितोषिक मिळाले. स्पर्धेतील सहभागी संघांनी के लेल्या मतदानातून सर्वाधिक मते आयसर पुणेच्या प्रकल्पाला मिळाली. त्यामुळे स्पर्धेत दुहेरी यश प्राप्त झाल्याची माहिती डॉ. गलांडे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian institute of science education and research mppg
First published on: 30-11-2020 at 02:21 IST