निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं बीड जिल्ह्यातील आष्टीतील कड्याजवळच्या कुंभारवाडीमध्ये रविवारी दुपारी किर्तन होते. या किर्तनाला येताना इंदुरीकर महाराजांचे जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे ‘आय सपोर्ट इंदुरीकर’ अशा नावाचे फलक घेतलेले लोक या कीर्तनामध्ये सहभागी झाले होते. महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशाही आशयाचे फलक लोकांच्या हातात होते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कीर्तनामध्ये बोलताना ते म्हणाले की, माझे दिवस सध्या वाईट आहेत, चांगलं काम करताना एवढा त्रास होतोच. या विषयावर मला काहीच बोलायचे नाही, असं मत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केले. मी घरच्यांसाठी कमी व समाजासाठी जास्त वेळ देत आहे. ते चुकीचे वाटत असेल तर मला वेगळा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

इंदोरीकरांच्या समर्थनार्थ सुरेश धसांची उडी..!

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सरकारवर निशाणा साधत इंदुरीकरांच्या समर्थनार्थ या वादात उडी घेतलीये. इंदुरीकर महाराज जे बोलले त्यात गैर काय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना नोटीस पाठवणं चुकीचे आहे.

काय आहे प्रकरण?
अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज यांनी त्यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं. . हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला. तसंच त्यांना या प्रकरणी नोटीसही बजावली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indurikar maharaj says i didnt do anything wrong nck
First published on: 17-02-2020 at 14:10 IST