Parbhani : परभणीतील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान प्रकरणातील मुख्य आरोपी मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. यावरून विरोधकांनीही गदारोळ केला. आता या आरोपीच्या मानसिक आरोग्याविषयी त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या आरोपीवर अकोल्याच्या केळकर रुग्णालयात उपचार होते. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. राधिका केळकर म्हणाल्या, आरोपीला स्किजोफ्रेनिया आजार आहे. स्किजोफ्रेनिया विथ अल्कोहोल डिसॉर्डर हा आजार होता. या आजारावर उपचार म्हणून सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान तो रुग्णालयात दाखल होता. त्याच्यावर उपचार झाले. त्याचा गंभीर स्वरुपाचा आजार होता. त्याच्या लक्षणांवर उपचार करणं आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. पण उपचारांदम्यान त्याच्यात सुधारणाही दिसत होत्या.”

हेही वाचा >> Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!

लोकांच्या भावना दुखावल्या, पण तो…

“रुग्णालयातून घरी गेल्यावर रुग्ण वेळेवर गोळ्या घेत नाहीत किंवा औषधं घेणं सोडतात त्यामुळे केमिकल इम्बॅलन्स होतो. त्यात ते असंबंधित बडबड करतात. खऱ्या नसलेल्या गोष्टी बोलतात. संशय घेतात. नातेवाईकांवर संशय घेतात. हे रुग्ण आक्रमक असतात. रुग्णालयात असताना त्यांची आक्रमकता कमी झाली होती. पण परत घरी गेल्यावर त्यांची आक्रमकता वाढली असेल. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कारण लोकांना माहीत नव्हतं की तो रुग्ण आहे. तो इथे होता तेव्हाही असंच राजकीय बडबड करायचा. नेत्यांविषयी बोलायचा. आम्ही त्याला गांभीर्याने घ्यायचो नाही. कारण तो आजाराचा एक भाग होता. हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मानसिक आजारात अशा गोष्टी होऊ शकतात”, असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर याविरोधात हिंसाचार घडला होता. या हिंसाचारात अनेक लोकांची धरपकड करण्यात आली. त्यात सोमानथ सूर्यवंशी या तरुणालाही अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत असताना या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळलं असल्याने या प्रकरणाची सर्वंकष चौकशी केली जात आहे.