एकीकडे देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट उभं असताना सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी देशासमोर अजून मोठं संकट उभं करण्याची तयारी चालवली असल्याचं जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान समोर आलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी जेरबंद केलं असून त्याच्याकडून महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये तब्बल सहा महिन्यांपूर्वी रेकी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे! या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून नागपूरमध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

जुलैमध्ये झाली रेकी!

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच जुलै २०२१मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या काही दहशतवाद्यांनी नागपूरमध्ये रेकी केल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये नागपूरमध्ये असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचा देखील समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधून एका दहशतवाद्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीमधून ही बाब समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काल (गुरुवार) अशी माहिती मिळाली होती की जैश ए मोहम्मदच्या काही दहशतवाद्यांनी नागपूरमधल्या काही ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर आम्ही आमची कारवाई सुरू केली. UAPA कायद्यांतर्गत आम्ही एक गुन्हा दाखल केला असून त्यावर क्राईम ब्रांच तपास करत आहे. या सर्व ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे”, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.