मागील काही दिवसांपासून ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटात धुसपूस सुरू आहे. यापूर्वी काही वेळा ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. ठाण्यातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन अलीकडेच जोरदार राडा झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा ठाण्यात ठाकरे-शिंदे गट आमने-सामने आला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याप्रकरणी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. रोशनी शिंदे असं या मारहाण झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणप्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

हेही वाचा- “डिग्री काय, मोदी हा माणूसच बनावट! १९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट १९८३ च्या प्रमाणपत्रावर कसा?”

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी टीकास्र सोडलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुढील ४८ तासांत ठाण्यातील पोलीस आयुक्त आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून दाखवावी, असं आव्हान जयंत पाटलांनी फडणवीसांना दिलं.

हेही वाचा- शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांवर हल्ला करत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर त्यांच्या अधिकारांतर्गत येत नाही. सध्या ठाणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बघितली, तर माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, त्यांनी आज, उद्यापर्यंत किंवा पुढील ४८ तासांत ठाणे शहरातल्या पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस अधिकाऱ्यांची ठाणे शहाराच्या बाहेर महाराष्ट्रात बदली करावी. असं केलं तरंच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये खरंच दम आहे, असं आम्ही समजू. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस खातं वागत नाही, यावर आम्ही विश्वास ठेऊ…”