maharashtra assembly session updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. सध्या राज्याचा कारभार शिंदे गट-भाजपा संयुक्तपणे पाहात आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या सत्तांतर नाट्यावर खरपूस चर्चा होत आहे. आजदेखील (२४ ऑगस्ट) जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि मंत्रीपद तसेच खातेवाटपावरून शिंदे गट-भाजपात असलेल्या नाराजीवरून टोलेबाजी केली. त्यांनी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना कुठे अॅडजस्ट करणार, औरंगाबादची एक टोपी घेतली (अब्दुल सत्तार) दुसऱ्या टोपीवर (हरिभाऊ राठोड) अन्याय का? अशी मिश्किल टिप्पणी केली.

हेही वाचा>> “इकडे या, कुठलीही भानगड न ठेवता मुख्यमंत्रीपद देऊ!” भर सभागृहात जयंत पाटलांची एकनाथ शिंदेंना ऑफर

“तुम्ही अब्दुल सत्तार यांना मंत्री केलं. संदीपान भुमरे यांना मंत्री केलं. आता आमच्या संजय शिरसाट यांचं काय होणार? शिरसाट यांना काही चान्स आहे का? एका जिल्ह्यात दोन मंत्री झाले. संजय शिरसाट यांना कसं अॅडजस्ट करणार? हरिभाऊ रोठोड यांनी आरएसएसचं काम खूप वर्षे केलं. त्यांना एकदा विधानसभेचं अध्यक्ष केलं. त्यावेळी ते चिडले होते. औरंगाबाद जिल्ह्याची एक टोपी घेतली मग दुसरी टोपी का नाही घेतली? जी निष्ठेची टोपी आहे ती बाहेर ठेवली,” अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली.

हेही वाचा>> “कोणी काहीही म्हणू दे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरू हे…”; अमोल कोल्हेंचं राज्यपाल कोश्यारींसमोर विधान!

“आमच्या काँग्रेसच्या विचाराच्या माणसाला तुम्ही खांद्यावर घेतलं. अब्दुल सत्तार आमचे मित्र आहेत. ते २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमच्याच पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. हरिभाऊ राठोड यांच्यासारख्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा यावेळी विचार का नाही केला?” असे मिश्किल भाष्य करत त्यांनी भाजपा तसेच शिंदे गटातील असंतुष्ट नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा>> सर्व काही घटनाबाह्य करायचं आहे का? विचारणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “काही लोक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली. “मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे, असे चंद्रकांत पाटील एका बैठकीत म्हणाले होते. भारतीय जनता पक्षाने मनावर दगड ठेवून आमच्या शिंदे यांना मुख्यमंत्री केले असेल तर कुठलीही भानगड ठेवता आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ. तुमच्यातील गुण पाहता तसे करण्यास कोणीही नकार देणार नाही,” असे मिश्किल भाष्य करत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.