scorecardresearch

Premium

“जे दादांना कळलं, ते तुम्हाला कळलं नाही”, जयंत पाटलांचा शिंदे, फडणवीसांना टोला; अजित पवार म्हणाले…

“इथे आपला संसार फाटायला निघालाय अन्…”, असे म्हणत जयंत पाटलांनी शिंदे, फडणवीसांना सुनावलं आहे.

jayant patil ajit pawar
जयंत पाटलांनी विधानसभेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजस्थान, तेलंगणात, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच प्रचारसभा घेतल्या. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. “इथे आपला संसार फाटायला निघालाय आणि दुसऱ्यांचा संसार जोडायला मंत्री महाराष्ट्राच्या बाहेर पळत आहेत,” असं जयंत पाटलांनी म्हटलं.

जयंत पाटील म्हणाले, “बळीराजा अवकाळी आणि गारपीटीचा मारा सहन करतोय. पण, सत्ताधारी पक्षातील मंत्री शेजारील राज्यांत प्रचारामध्ये गुंतले होते. अन्य राज्यांत प्रचार करण्यास हरकत नाही. इथे आपला संसार फाटायला निघालाय आणि दुसऱ्यांचा संसार जोडायला मंत्री महाराष्ट्राच्या बाहेर पळत आहेत. हे चित्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगले नाही.”

Eknath SHinde uddhav Thackeray (3)
“मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “पंतांना भर सभेत…”
lalu prasad yadav nitish kumar
Video: ‘नितीश कुमार परत तुमच्याकडे आले तर काय कराल?’ लालू यादव म्हणाले, “ते जेव्हा येतील…”!
Uddhav Thackeray Slams BJP
“ते जय श्रीराम म्हणतात, मी त्यांना…..”; उद्धव ठाकरेंची भाजपावर जहरी टीका
MLA Shahaji Patil
तर मी उद्धव सेनेत जायला तयार – आमदार शहाजी पाटील

हेही वाचा :“…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”, उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

“भाजपाला विजय झाला, याचा आनंद आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा असल्यामुळे मंत्र्यांनी प्रचाराला जाण्याची गरज नव्हती. तुम्हाला तिकडे कोण विचारतं? पंतप्रधानांच्या करिष्यामुळे विजय झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी गेले. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारासाठी गेले नाहीत,” असं जयंत पाटलांनी म्हटलं.

यावर अजित पवार म्हणाले, “आम्ही तिथे जाऊन काय दिवा लावणार आहे? पंतप्रधानांच्या नावावरच उमेदवार निवडून येतात.”

हेही वाचा : “रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष, त्यांना…”, अमोल मिटकरींची टीका, ‘संघर्ष यात्रे’लाही केलं लक्ष्य

लगेच जयंत पाटलांनी म्हटलं, “हेच मी सांगतोय, यांनी जाऊन काय दिवा लावलाय? जे दादांना कळलं, ते तुम्हाला कळलं नाही. शेतकऱ्यांचा संसार फाटला आहे आणि सरकारला त्यांच्याकडे पाहायला वेळ मिळाला नाही. मागील हंगाम वाया गेला आहे. हा सुद्धा हंगाम वाया जाण्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. मुलींचं लग्न, शिक्षणाची फी असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे आहेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil taunt eknath shinde devendra fadanvis ajit pawar on modi nagpur vidhansabha ssa

First published on: 11-12-2023 at 16:31 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×