राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर सोलापूरचे भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांना ओळखत नसल्याची प्रतिक्रिया दिली. यानंतर आता खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. “सुप्रिया सुळे मला ओळखत नसतील, पण मी त्यांना ओळखतो,” असं मत जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी व्यक्त केलं. यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा नेते सुभाष देशमुख देखील होते.

भाजपा खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले, “खासदार सुप्रिया सुळे मला ओळखत नसतील, पण मी त्यांना ओळखतो. आता जर मी त्यांच्यासमोर उभा राहिलो तरीही त्या मला ओळखत नसतील तर मी काही बोलू शकत नाही. आमची दोन-तीन वेळा भेट झाली आहे. मात्र, सोलापूरमधील विकास कामांबाबत त्यांच्याशी कोणताही विचारविनिमय झालेला नाही. कारण आम्ही ज्यांच्याशी चर्चा करायची होती त्यांच्याशी संवाद साधत राहिलो.”

हेही वाचा : “अत्यंत खालच्या पातळीवरील लज्जास्पद…”; सुप्रिया सुळेंवरील चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर प्रियांका चतुर्वेदींचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही मंत्रिमंडळातील जोशी आणि इतर व्यक्तींशी संवाद साधत आलो. यासाठी सुप्रिया सुळे यांच्याशी माझं काहीही बोलणं झालेलं नाही,” असंही जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी नमूद केलं.