Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress: काँग्रेसचे वरीष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वासोबतच विधानसभा आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीवरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे इतरही काही आमदार बाहेर पडणार असल्याचे दावे भाजपाकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवाजी काँग्रेस पक्ष – शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी दिलं इंदिरा गांधींचं उदाहरण!

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व १९७७ सालच्या निवडणुकांचा उल्लेख करण्यात आला आहे. “आणीबाणीनंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधींविरूद्ध सर्व, अशी एक लढाई झाली होती. या लढाईत इंदिरा गांधी यांचा दारूण पराभव झाला. हळूहळू सगळ्यांनीच त्यांची साथ सोडायला सुरूवात केली. पण, संजय गांधी यांच्या नेतृत्वाखालील युवकांनी रिकाम्या जागा भरण्यासाठी एक नवीन फळी निर्माण केली”, असं आव्हाडांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

solapur lok sabha 2024 marathi news
सोलापूरमध्ये चुरस वाढली, उभय बाजूने आक्रमक प्रचार
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
dombivli marathi news, dombivli varun sardesai marathi news
“श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ”, शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

तरुण कार्यकर्त्यांना केलं आवाहन

“संजय गांधी यांच्या याच प्रयत्नांचा परिपाक म्हणजे, १९८० साली ३०० च्या वर जागा जिंकून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. त्यामुळे नेते सोडून गेल्याने पक्ष रसातळाला गेला, असे कधीच होत नाही. पक्षाचा ‘मणका’ म्हणजे कार्यकर्ते असतात अन् त्यातल्या त्यात तरूण मुले आणि मुली असतात! शेवटी रस्त्यावर येऊन लढण्याचे काम हे तरूण कार्यकर्तेच करीत असतात. किंबहुना जवळपास सर्वच आंदोलनात या तरूण कार्यकर्त्यांचाच अधिक सहभाग असतो”, असं नमूद करत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

“विरोधी आघाडीतील सर्वच पक्षांनी लक्षात ठेवावे की, सर्व तरूण कार्यकर्त्यांना एक उत्तम संधी लाभली आहे. हे राज्य, या राज्याचे बिघडलेले राजकारण, बिघडलेली सामाजिक अवस्था, सुसंस्कृत राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आणि लोकशाहीची होत असलेली गळचेपी यातून मार्ग काढण्याची ताकद आणि हिंमत त्यांच्यातच आहे. तरूणांनो, तयार रहा, पुढचा महाराष्ट्र आणि पुढचा भारत तुमच्या हातातच असेल”, असं आव्हाड आपल्या पोस्टमध्ये शेवटी म्हणाले आहेत.

Ashok Chavan Resigned: “अशोक चव्हाण काल संध्याकाळी म्हणाले होते की…”, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितल्या रविवारच्या घडामोडी!

का दिला राजीनामा? अशोक चव्हाण म्हणाले…

दरम्यान, एकीकडे राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी आपण का राजीनामा दिला, यावर भूमिका मांडली आहे. “मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत तुम्हाला सर्वकाही सांगेन”, असं अशोक चव्हाण म्हणाले. “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. मी जन्मापासून काँग्रेसचं काम केलं आहे, आता मला वाटलं अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे”, असं ते म्हणाले.