कणकवली नगर पंचायत पंचवार्षिक निवडणूक येत्या ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल १ एप्रिलला होईल. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा फडकाविण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना राष्ट्रवादीतून काँग्रेस प्रवेश दिल्याने या निवडणुकीचा सत्तासंघर्षांचा निकाल कणकवलीकर कसा काय देतात याकडे लक्ष वेधले आहे. कणकवली नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ३१ मार्च रोजी मतदान तर १ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. कणकवली नगर पंचायतची मुदत २० एप्रिल रोजी संपत आहे. १ ते ७ मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, ८ मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी, १८ मार्चला अर्ज मागे घेणे, १९ मार्चला चिन्हांचे वाटप असा कार्यक्रम जाहीर केला आहे. कणकवली नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात शहर विकास आघाडी निर्माण होईल असे बोलले जात आहे. कणकवली नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर संदेश पारकर यांना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस प्रवेश दिल्याने या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व भाजप या नगर पंचायत निवडणुकीत सत्तासंघर्षांसाठी सज्ज झाले आहेत. सर्वच पक्ष स्वबळावर लढले तर त्याचा फायदा साहजिकच एखाद्या पक्षाला होईल. या ठिकाणी सर्वच पक्ष मतविभागणी करू शकतात. हे टाळण्यासाठी काँग्रेसविरोधी शहर विकास आघाडीचा पर्याय ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी सत्तासंघर्षांवर बोलताना शहर विकास आघाडीवर एकमत झाले नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढू शकते, पण पुन्हा तेच नको म्हणजेच काँग्रेस पक्षाविरोधात लढण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. कणकवली नगर पंचायत निवडणुकीत सत्तांतर गरजेचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2013 रोजी प्रकाशित
कणकवली नगर पंचायत निवडणूक ३१ मार्चला
कणकवली नगर पंचायत पंचवार्षिक निवडणूक येत्या ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल १ एप्रिलला होईल. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा फडकाविण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना राष्ट्रवादीतून काँग्रेस प्रवेश दिल्याने या निवडणुकीचा सत्तासंघर्षांचा
First published on: 05-03-2013 at 04:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kankavli nager panchyat election on 31st march