दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्‍यावर असतानाच कर्नाटकने सोडलेल्या पाण्याने पूर्व भागातील तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला आहे. कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्‍वर योजनेतून पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘कास पठार कुंपणमुक्त होणार असल्याने फुलांचा बहर वाढणार’; आमदार शिवेंद्रराजेंचा विश्वास

जतच्या सीमावर्ती भागातील ४० गावांवर कर्नाटकने हक्क सांगितला असताना पूर्व भागाचा प्रलंबित पाणी प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजनेला राज्य सरकारने तत्वत: मंजुरी दिली असून ही योजना पूर्ण होईपर्यंत तातडीने पूर्व भागातील काही तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून भरून घेता येउ शकतील का याचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाहणीसाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी जत दौर्‍यावर होते.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंची पुन्हा शिवाजी महाराजांशी तुलना; गनिमी काव्याचा उल्लेख करत संजय गायकवाडांचं मोठं विधान

कर्नाटकने सीमावर्ती भागासाठी तुबची बबलेश्‍वर योजना गतीने पूर्ण केली असून या योजनेतून कर्नाटकातील इंडी व चडचणसाठी जत पूर्व भागातील तिकांेंडीसह काही गावातून नैसर्गिक उताराने पाणी जाउ शकते. याच स्थितीचा फायदा उठवत कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने कालपासून या योजनेचे पाणी यतनाळ ओढापात्रात सोडले असून या पाण्यामुळे तिकोंडी तलाव गुरूवारी ओसंडून वाहू लागला आहे. या कृतीद्बारे सीमावर्ती भागास कर्नाटकच तातडीने पाणी देऊ शकते हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न मानला जात आहे.

हेही वाचा- “दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि…”, पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

दरम्यान, म्हैसाळ विस्तारित योजनेबाबत वस्तुस्थिती निदर्शक अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना शासनाने दिले आहेत. या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी गुरूवारी जतचा पाहणी दौरा केला. जिल्हाधिकार्‍यांनी आज तिकोंडी तलावाची पाहणी केली, तसेच श्रीक्षेत्र गुड्डापूर येथे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेउन उमदीचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी जतच्या भौगोलिक स्थितीची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍याकडून नकाशाद्बारे घेतली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka released water in tikondi dam in the drought stricken areas of jat during collector visit dpj
First published on: 01-12-2022 at 19:37 IST