उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्वाला कलंक लावला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला उद्धव ठाकरेंनी तिलांजली वाहिली आहे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी अमरावती आणि नागपूरमध्ये झालेल्या सभेत किरीट सोमय्यांचा उल्लेख उपरा असा केला होता. त्यावर त्यांनी काहीही भाष्य केलं नाही. मात्र नागपूरच्या भाषणात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस हे नागपूरचा कलंक आहेत असं म्हणाले आहेत. त्यावर आता किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला कलंक लावल्याचं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नागपुरात कार्यकर्त्या मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला देवेंद्र फडणवीस ‘कलंकीचा काविळ’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कविताच ट्वीट करत उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- “पडवळ बाहूचे पसरुनी पंख, दूध पाजणारासी घेतो डंख..”, उद्धव ठाकरेंवर अख्खी कविताच सादर करत भाजपाची टीका

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- ‘कलंकीचा काविळ’! देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना ८ मुद्द्यांतून प्रत्युत्तर; दिला ‘हा’ सल्ला

उद्धव ठाकरे यांनी नागपूरचा कलंक असं देवेंद्र फडणवीस यांना म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही आठ मुद्दे उपस्थित करत तुम्हीच कसे कलंक आहात? हे उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. त्यानंतर कलंक या शब्दावरुन राज्यात राजकारण पेटलं आहे. संजय राऊत यांनी सरकारच कलंकित आहे असं म्हटलं आहे. तर भाजपाचे सगळेच नेते आता उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत.