शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्यांचे संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केल्यानंतर त्यावर आता किरीट सोमय्यांनी पलटवार केला आहे.

किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

किरीट सोमय्यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “२०१७मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्राध्यापिका डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर इमारत बांधकाम कंपनीच्या संदर्भा आरोप करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी माझा मुलगा नील सोमय्याचं नाव घेतलं आहे”, असं सोमय्या म्हणाले.

भाजपाचे ‘ते’ साडेतीन लोक कोण? संजय राऊत म्हणतात, “कुणी अर्धा आहे, कुणी पाव आहे, कुणी चाराणेवाला…”!

“आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधील नेत्यांनी माझ्याविरोधात १० गुन्हे दाखल केले आहेत. अजून तीन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मी त्यांची (संजय राऊत) परिस्थिती समजू शकतो. अजून एका चौकशीचं मी स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आम्ही कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतलेलो नाही”, असं सोमय्या म्हणाले.

“आज फिर एक बिल्लीने…”, अमृता फडणवीसांचा राऊतांच्या आरोपांवर खोचक टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोविड सेंटर घोटाळ्यावर का बोलत नाही?”

दरम्यान, आपल्या ट्वीटमधून किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत? प्रविण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांवर का बोलत नाहीत? भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे”, असं किरीट सोमय्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.