सोलापूर : कर्नाटकातून दिल्लीकडे निघालेल्या के. के. एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये अचानक पणे विजेचा शाॕर्टसर्किट होऊन आग लागली. ही घटना निदर्शनास येताच रेल्वेचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग विझविण्याच्या प्रयत्नात रेल्वेचालक भाजून जखमी झाला. सोलापूर-कुर्डूवाडी दरम्यान सकाळी मोहोळजवळ ही घटना घडली.

बंगळुरू-दिल्ली के. के. एक्सप्रेस (१२६२७) सकाळी सोलापुरात थांबा घेऊन पुढे निघाली. परंतु मोहोळजवळ घाटणे गावच्या परिसरात रेल्वे इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे रेल्वेचालक विकासकुमार यांच्या लक्षात आले. त्याचवेळी रेल्वे मागाच्या दोन्ही बाजूंकडील शेतात राहणारे काही शेतकरीही धावून आले. रेल्वेचालकाने प्रसंगावधान राखून प्रथम गाडीचा वेग कमी केला आणि गाडी थांबविली. तेव्हा इंजिनमध्ये विजेचे शाॕर्टसर्किट होऊन आग लागल्याचे दिसून आले. ही माहिती रेल्वेचालकाने तात्काळ रेल्वे नियंत्रण कक्षाला कळविली.

Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
| Unable to board AC coach, angry passenger breaks train door’s glass Viral video
“रेल्वेच्या एसी डब्यात चढता येईना, चिडलेल्या प्रवाशाने रागात फोडली दरवाज्याची काच, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

तेव्हा या मार्गावरून धावणा-या इतर रेल्वेगाड्या नजीकच्या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या. आग लागलेल्या इंजिनच्या पाठीमागे असलेल्या अनारक्षित सर्वसाधारण डब्यातून प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यासाठी घाठणे गावातील शेतकरी किशोर देशमुख, विश्वास देशमुख, रामचंद्र चव्हाण, गणेश लाळे आदींनी प्रवाशांना डब्यातून सुखरूपपणे बाहेर काढले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.