कोल्हापूर : निवृत्त सैनिकांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा नवव्या नागपंचमीच्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या दारातच नागाची पूजा करून निद्रिस्त विद्यापीठ प्रशासनाला नागपंचमीच्या उपहासात्मक शुभेच्छा दिल्या.
नागाच्या प्रत्येक फणीवर माजी सैनिकांच्या मागण्या लिहिलेल्या होत्या. शिवाजीराव परुळेकर यांनी शांततामय मार्गाने चाललेले आंदोलन विद्यापीठ प्रशासनाने सर्व मार्ग वापरून दडपण्याचा प्रयत्न केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत थांबणार नाही. उलट ते तीव्र होईल, असा इशारा दिला.
भर पावसात आंदोलन केल्याने दत्तात्रय मोहिते हे तापाने फणफणल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पुढचा टप्पा म्हणून प्रत्येक दिवशी दोन आंदोलक चक्री उपोषण करून आंदोलनाची तीव्रता वाढवतील, असा निर्धार करण्यात आला. या वेळी सर्व निवृत्त सैनिक, मधुकर पाटील, रवी जाधव, अरुण पवार, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, शशिकांत रथपवार, महिला आघाडीचे अध्यक्ष यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.