कोल्हापुरी चप्पल आता अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ट्विट करुन याबद्दल ही माहिती दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाइन विक्रीला प्रारंभ झाला आहे. देशभरात लौकिक असलेली कोल्हापुरी चप्पल आता अ‍ॅमेझॉनवर डिजिटल बाजारपेठ विक्री संकेत स्थळावर उपलब्ध आहे असंही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देऊन महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी ऑनलाइन प्रॉडक्ट विक्रीचा शुभारंभ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.एवढंच नाही तर कोल्हापुरी गूळ, काकवी, व्हाइट मेटल ज्वेलरी, कोल्हापुरी दागिने, मध, विविध प्रकारचे मसाले, कोल्हापुरी कांदा व लसूण चटणी, मिरची पावडर, गारमेंट प्रॉडक्ट, मास्क या वस्तूही अ‍ॅमेझॉनवरवर उपलब्ध होणार आहेत.