लेह-श्रीनगर मार्गावरील दराज येथे महिपाळगड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. ८ मार्च) ही घटना घडली. यामुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
महादेव तुपारे यांचा बर्फवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी तुपारे कुटुंबियांनी गुरुवारी कळवली. महादेव तुपारे हे १६ कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे २००५ साली सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. सैन्यात ते क्लार्क या पदावर कार्यरत होते. लेह-श्रीनगर भागात बर्फवृष्टी होत असल्याने महादेव यांचं पार्थिव पोहोचवण्यासाठी अडथळा येत असल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2017 रोजी प्रकाशित
श्रीनगरजवळ बर्फात गुदमरुन कोल्हापूरचे जवान महादेव तुपारेंचा मृत्यू
महादेव तुपारे हे १६ कुमाँऊ रेजिमेंटमध्ये होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-03-2017 at 08:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapurs chandgads jawan mahadev tupare death suffocation ice snowfalls leh srinagar