सांगली : अख्खा जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना शुक्रवारी सांगली जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी आयोजित गायनाच्या कार्यक्रमावेळी संस्था प्रतिनिधींनी लावणीवर नृत्याचा ठेका धरला. लावणीबरोबरच भोजनावळीचेही आयोजन करण्यात आले होते. शेतकर्‍यांना अपघाती विमा संरक्षण आणि एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याचे महत्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आल्याचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “…तर संभाजीनगरमधील एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाणार”, संजय राऊतांचा इशारा

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त

लावणीच्या ठेययाने गाजली. तर उपस्थित संस्था प्रतिनिधीसाठी सुग्रास भोजनाचीही पहिल्यांदाच व्यवस्था करण्यात आली होती.

जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आमदार श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकरकमी कर्ज परतफेड योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून एक वर्ष मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सभासद शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन लाखामधून संबंधित शेतकर्‍याची कर्जफेड करून घेण्यात येणार असून जर रक्कम उरली तर ती वारसांना मिळणार आहे. तसेच अपघाती मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या दोन वारस मुलांना प्रत्येकी २५ हजार रूपयांची मदत बँकेच्यावतीने देण्यात येणार आहे. माणगंगा कारखाना गेली आठ वर्षे बंद आहे. बंद कारखान्याची विक्री केली तर अपेक्षित रक्कम येणार नाही. म्हणून नव्याने आलेल्या संचालक मंडळाला भाडेकराराने कारखाना चालवण्यास देउन कर्ज परतफेड करून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष आ. नाईक यांनी सांगितले. सभेसाठी संचालक आमदार अनिल बाबर, मनोज शिंंदे वगळता अन्य संचालक उपस्थित होते.

हेही वाचा >>> शासकीय कार्यालयातील कंत्राटी पदभरतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ही पदभरती तात्पुरत्या…’

दरम्यान, सभा सुरू होण्यापुर्वी उपस्थित संस्था प्रतिनिधींच्या मनोरंजनासाठी गीतगायनाचा कार्यक्रम आणि सुग्रास भोजनव्यवस्था करण्यात आली होती. सभागृहात लावण्या सादर केल्या जात असताना काही जण प्रेक्षागारातून नृत्य करीत होते. तर पंगतीमध्ये फिरून काही संचालक उपस्थितांना जेवणासाठी आग्रह करीत होते. एकीकडे जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना मनोरंजनासाठी लावण्याचा कार्यक्रम आणि भोजनावळ आयोजित केल्याबद्दल काहींनी नाराजीही व्यक्त केली.