विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत आमचेच सहा उमेदवार निवडून येणार असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. तर दुसरीकडे शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेनेच्या याच नाराजीवर काँग्रेस नेते तथा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Legislative Council elections : विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; हरिभाऊ बागडेंनी बजावला सर्वप्रथम मतदानाचा हक्क

“शिवसेनेच्या आमदारांविषयी मी सांगणे उचित नाहीये. पण राज्ससभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत तसेच दुसऱ्या उमेदवाराला मिळालेली मतं पाहता हा आकडा ७४ होतो. त्यांची मतं कुठे कमी झाली? आम्ही त्यांना मतं दिली. राज्यसभेत आम्हाला दोन मतं अधिक मिळाली होती. याबाबत शिवसेनेच्या आमदारांचा गैरसमज होता. तो आता दूर झाला आहे,” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक : ‘…म्हणूनच त्यांनी पराभवाची स्क्रीप्ट अगोदरच तयार केली,’ चंद्रकांत पाटलांचा नाना पटोलेंना टोला

तसेच, क्रॉस व्होडिंगची भीती आहे का असे विचारले असता आमच्यासोबत अनेक अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. “पक्षाशी बांधील असलेल्यांना अजिबात भीती नाही. सर्व आमदार पक्षाशी बांधील आहेत. पक्षाच्या उमेदवाराला फटका बसणार नाही. जे बाहेरचे मतदार आहेत त्यांच्या बाबतीत ही अफवा पसरवली जात आहे. जो तो त्यांच्या विचारांशी बांधील आहे. अपक्ष तसेच अनेक घटक पक्ष महाविकास आघाडीसोबत आहेत. काही आमदार शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही,” असेदेखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislative council election vijay wadettiwar comment on shiv sena mla prd
First published on: 20-06-2022 at 09:31 IST