‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. नीलम राणे आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने कर्ज घेतलं होते. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, हे सर्क्युलर रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत.
नीलम राणे आर्टलाइन प्रॉपर्टीज कंपनीने डीएचएफएलकडून सुमारे ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे या कर्जासाठी करण्यात आलेल्या अर्जात सहअर्जदार होते. त्याची ३४ कोटीपर्यंत थकबाकी होती. डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी लुक आउट सर्क्युलर जारी केलं होतं. दरम्यान, राणे कुटुंब आणि डीएचएफएल यांच्यातील व्यवहार पुर्ण झाल्यामुळे पोलिसांनी सर्क्युलर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती क्राईम पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.
पुणे पोलिसांनी सर्क्युलर जारी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कारण हे सर्क्युलर अशावेळी आल होत ज्यावेळी मुख्यमंत्री आणि राणे कुटुंब यांच्यातील संघर्ष पेटला होता. त्यावेळी नितेश राणे यांनी थेट सरकारवर टीका केली होती. नितेश राणे म्हणाले होते, “हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे डीएचएफएलचे खाचे मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यापुर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्यामुळे अशा नोटिसीला उपयोग नाही. या प्रकराणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रांचची अडचण होणार, महाविकास आघाडीची अडचण होणार.”