सातारा : महाबळेश्वर येथे कालपासून सुरू झालेला महोत्सव संगीत, मनोरंजनाच्या कार्यक्रमासह मैदानी खेळांनी रंगला. या महोत्सवात पर्यटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, मोठी गर्दी झाली आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने महाबळेश्वर येथे ‘महापर्यटन उत्सव : सोहळा महाराष्ट्राचा’ या तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवामध्ये शनिवारी विल्सन पॉइंट येथे योग सत्र आणि मॉर्निंग रागाज् – वाद्य संगीत, फन रन आणि सायक्लॉथॉन यांचे आयोजन करण्यात आले. सायक्लॉथॉनचा शुभारंभ पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला. जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांची या वेळी उपस्थिती होते. डॉ. गजानन सराफ आणि सहकारी यांनी हे योगसत्र घेतले. प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांनी बासरीवादन सादर केले.

या उत्सवात विविध नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्र प्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, मुलांसाठी कार्यशाळा, हेलिकॉप्टर राइड, ड्रोन शो, फूड स्टॉल, फ्ली बाजार, मंदिर तथा अन्य पर्यटनस्थळांना भेटी, फोटोग्राफी कार्यशाळा, तरंगता बाजार (फ्लोटिंग मार्केट), लेझर शो, योग सत्र आणि मॉर्निंग रागाज् – वाद्य संगीत, फन रन आणि सायक्लॉथॉन परिसंवाद – जल पर्यटनातील संधी, बायोडायनामिक फार्मिंग शाळा, महाराष्ट्राचे पर्यटन धोरण, कार्निव्हल परेड, हॅप्पी स्ट्रीट, बोट प्रदर्शनी व कार्यशाळा, हेलिकॉप्टर राइड, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, स्वरोत्सव अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामंडळाचे या वेळी महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे, वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांची उपस्थिती होती.