Premium

Maharashtra Assembly Winter Session 2023 : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून नागपुरात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासह महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा एकत्रित आढावा एका क्लिकवर…

Maharashtra Assembly Winter Session 2023 in Marathi
नागपूर महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३

Nagpur Winter Session 2023 Updates, 07 December 2023: आजपासून (७ डिसेंबर) नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनासाठी विविध पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे या अधिवेशनात यावर काही निर्णय होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटात असतील? याबाबत विविध तर्क लावले जात होते. नवाब मलिक यांनीही यावर कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती. पण आता मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…

Live Updates

Assembly Winter Session 2023 Nagpur Updates: नागपूर येथील हिवाळी अधिवेशानासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

19:35 (IST) 7 Dec 2023
गृहप्रवेशाचा मान विधवांना, कोल्हापुरातील पुरोगामी पाऊल

या कृतीने त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरच्या मातीत नवा पायंडा पाडला आहे.

सविस्तर वाचा…

19:22 (IST) 7 Dec 2023
तलाठी भरती परीक्षेत घोळ : प्रश्नपत्रिकांमध्ये तब्बल ११४ चुका…उमेदवारांसाठी भूमी अभिलेख खात्याचा मोठा निर्णय

११४ प्रश्नच चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसुची चुकलेले असे हे प्रश्न होते, त्याचे १०० टक्के गुण उमेदवारांना देण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

19:09 (IST) 7 Dec 2023
“आरक्षण मिळू द्या, मग भुजबळांना बघतो”, मनोज जरांगे यांचा इशारा

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकदा आरक्षण मिळू द्या, त्यानंतर छगन भुजबळ यांना बघतो, असा थेट इशारा दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

18:40 (IST) 7 Dec 2023
संपत्तीच्या वादातून आजी-आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या?

दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती.

सविस्तर वाचा…

18:28 (IST) 7 Dec 2023
वर्धा : कोंबड्यांचा अवैध जुगार

वर्धा : कोंबड्यांचा वापर जुगारासाठी करणे चांगलेच भोवले. समुद्रपुर तालुक्यातील शिवणी गावात कोंबड्यांचा जुगार भरल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि लगेच धाड पडली. जुगार खेळणाऱ्या निलेश नागपुरे, अतुल पवार, अनिकेत पवार, शंकर भोसले, रजनीकांत पवार, राहुल राऊत या परिसरातील युवकांना अटक करण्यात आली. अवैध जुगार अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली आहे. जुगारअड्ड्यावरून सहा कोंबडे, नऊ दुचाकी व रोख असा एकूण ७ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठाणेदार संतोष शेगावकर व चमूने ही कारवाई केली.

18:23 (IST) 7 Dec 2023
ओबीसींचे १६० आमदार आणून सत्ता हस्तगत करु – प्रकाश शेंडगे

ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जत मध्ये सकल ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आला.

सविस्तर वाचा…

17:55 (IST) 7 Dec 2023
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून नागपुरात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील तारसा गावात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. धान, कापूस, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्यामुळे तेथील शेतकर्‍यांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल पाटील, आमदार आशिष जयस्वालही फडणवीसांबरोबर उपस्थित होते.

17:48 (IST) 7 Dec 2023
बालेकिल्ल्यात शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकाच व्यासपीठावर? ‘हे’ निमित्त…!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वागत समिती अध्यक्ष आणि प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत असणार आहेत.

सविस्तर वाचा…

17:39 (IST) 7 Dec 2023
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुणे दौऱ्याचा असाही फायदा

पुण्यासारख्या महानगरात पाण्याची एवढी गंभीर परिस्थिती असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी स्वतः अनुभवले.

सविस्तर वाचा…

17:31 (IST) 7 Dec 2023
आमच्या रेटयामुळे अखेर कुंभकर्ण सरकार जागे… वडेट्टीवार

नागपूर: अवकाळी पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात मांडली. सविस्तर वाचा…

17:11 (IST) 7 Dec 2023
पीक विम्याचे ५२ रुपये नेण्यासाठी शेतकऱ्यांनी आणली चक्क तिजोरी; पोलिसांना म्हणाले, सुरक्षा पुरवा….!

यवतमाळ: अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पीक विमा कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांना ३५, ५०, ९० रुपये नुकसान भरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

सविस्तर वाचा…

16:55 (IST) 7 Dec 2023
कैद्यांच्या उपाहारगृह सुविधांमध्ये वाढ, १६७ वस्तू खरेदीची मुभा

बर्मुडा पॅन्टपासून, सरबत आणि बुद्धीबळ पट आणि गोड पदार्थही मिळणार. पेढा- बर्फी आणि एक किलोच्या केकला मनाई.

सविस्तर वाचा…

16:51 (IST) 7 Dec 2023
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

नागपूर: नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांना त्यांनी भेटी दिली.

सविस्तर वाचा…

16:48 (IST) 7 Dec 2023
उरण : जासईच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंडाच्या इरादापत्राचे वाटप, गव्हाण स्थानकांच्या कामाचा मार्ग मोकळा

जासई ते गव्हाण मार्गासाठी जासई येथील ३७ शेतकऱ्यांच्या जमिनी २००५ ला संपादीत करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा…

16:48 (IST) 7 Dec 2023
रोहणा गावात दोन गटात वाद; गोळीबारात एक ठार, दोघे गंभीर जखमी; खामगाव तालुक्यासह जिल्हा हादरला!

बुलढाणा: बुलढाणा मार्गावरील रोहणा (ता खामगाव) गावात एकाच जातीच्या दोन गटात झालेल्या वादाचे भीषण घटनेत पर्यवसन झाले.

सविस्तर वाचा…

16:28 (IST) 7 Dec 2023
अशोक चव्हाण म्हणाले ‘काय सत्यजित’ … तांबेंचे उत्तरही दिलखुलास

नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला कधी काळी ‘हुरडा पार्टी’ अधिवेशन संबोधले जायचे. सभागृहात परस्परांवर तुटून पडणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते सभागृहाबाहेर पडल्यावर मात्र ऐकमेकांचे मित्र असल्यागत वागत. कालांतराने यात बदल झाला.

सविस्तर वाचा…

16:14 (IST) 7 Dec 2023
काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव नाकारला, नाना पटोले म्हणाले “सरकार…”

चर्चा टाळणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

सविस्तर वाचा…

15:51 (IST) 7 Dec 2023
“छगन भुजबळ कलंकित मंत्री”, मनोज जरांगेंची टीका

यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो, असा अप्रत्यक्ष इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

सविस्तर बातमी

15:33 (IST) 7 Dec 2023
नाना पटोले आणि आशिष शेलार यांचे हस्तांदोलन, संजय शिरसाठही सोबत; काय झाली चर्चा? वाचा…

नागपूरः भाजपा आणि काँग्रेस पक्षातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते सध्या वेगवेगळ्या मुद्यांवरून एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपा नेते आशिष शेलार विधिमंडळ परिसरात अमोरासमोर आले.

सविस्तर वाचा…

15:19 (IST) 7 Dec 2023
डॉक्टरने केला विश्वासघात! गुंतवणुकीच्या नावाखाली केली करोडो रुपयांची फसवणूक

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गुंतवणुकदारांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.

सविस्तर वाचा…

15:10 (IST) 7 Dec 2023
डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक पिंपाच्या स्फोटचार; कामगार भाजले; कंपनी प्रशासन, ठेकेदारा विरूध्द गुन्हा

डोंबिवली येथील एमआयडीसी भागातील पाॅलियुरोथिन कंपनीत प्रशासन, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका रासायनिक पिंपाचा स्फोट होऊन रविवारी चार कामगार गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी कंपनी प्रशासन आणि ठेकेदारा विरूध्द मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजू राठोड, कबीर भोईर, सुमीत राय, अभिषेक शाहू अशी गंभीर भाजलेल्या कामगारांची नावे आहेत. पोलिसांनी या कंपनीतील एक नियंत्रक ठेकेदार दीपक म्हात्रे, व्ही. सी. एम. पाॅलियुरोथिन कंपनी प्रशासना विरूध्द कामगार कबीर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

ज्वलनशील पदार्थ सुरक्षितरित्या न ठेवता निष्काळजीपणा केल्यामुळे कामगारांना दुखापत झाली, असा ठपका ठेवत पोलिसांनी कंंपनी अधिकारी, ठेकेदारा विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

14:53 (IST) 7 Dec 2023
मीरा भाईंदर मधील २१ आदिवासी पाड्यात विकास कामे करण्याचा पालिकेचा निर्णय

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील जुन्या आदिवासी पाड्यात रस्ते, पथ दिवे, पाणी पुरवठा आणि इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.त्यानुसार २१ पाड्यात ही विकासकामे करण्यासाठी नुकताच प्रशासकीय ठराव करण्यात आला आहे.

आता शहरातील २१ आदिवासी पाड्याच्या विकासाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.यात शासकीय नियमांच्या आधीन राहून अश्या पाड्यात पायवाट नेहणारा सीसी ( सिमेंट काँक्रीट ) रस्ता,सोलर पथ दिवे, स्मशाने, पाणी पुरवठा, समाज मंदिर आणि आरोग्य सेवा उभारण्यासाठी विशेष आराखडा तयार केला आहे. महत्वाची बाब म्हणजे या विकास कामासाठी येणाऱ्या खर्चास २ नोव्हेंबर रोजी काटकर यांनी विशेष ठराव करून मान्यता दिली आहे.त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या सोयी- सुविधापासून वंचित राहिलेल्या या पाड्याना आता खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे.

14:50 (IST) 7 Dec 2023
भाईंदर : थकीत अग्रीम निधी वसुल करण्याकडे पालिकेचे लक्ष

मीरा भाईंदर महापालिकेचा थकीत राहिलेला अग्रीम निधी वसुल करण्याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे.याबाबत सर्व विभाग प्रमुखांना खर्चाचा अहवाल सादर करून त्यात येणारी तफावत पगारातून भरण्याचे आदेश आयुक्तानी दिले आहेत.

२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ही थकीत रक्कम १ कोटी २६ लाख १ हजार २७६ रुपयांपर्यंत वाढली होती. त्यावेळी प्रशासनाने थकीत अग्रीम वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्यानंतर थकीत अग्रीमपैकी ७५ लाख ३७ हजार ९८३ रुपये प्रशासनाकडून वसूल करण्यात आले.मात्र अद्यापही ५० लक्ष ६३ हजार २९३ रुपये अग्रीम थकीत आहे.

याच गोष्टीची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त संजय काटकर यांनी थकीत अग्रीमच्या ठोस वसुलीसाठी कठोर पावले उचलल्यास सुरुवातीला केली आहे.ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अग्रीमची रक्कम अद्यापही जमा केलेली नाही त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पुढील वेतनामधून एकावेळी तब्बल ५० टक्के थकीत अग्रीम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.

14:50 (IST) 7 Dec 2023
पिंपरी : मोशीत पीएमपीएमलच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

उस्मान मुस्ताक अली खान (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

14:29 (IST) 7 Dec 2023
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चिडले : म्हणाले, ‘रोहित पवारांना योग्य वेळी…’

बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपा बाबत देवेंद्र फडणवीस काहीच बोलले नव्हते.

सविस्तर वाचा…

14:09 (IST) 7 Dec 2023
अजित पवार गटाच्या नेत्याकडून आव्हाडांची राखी सावंतशी तुलना

अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री राखी सावंतशी तुलना केली आहे.

सविस्तर बातमी

14:05 (IST) 7 Dec 2023
उरण – खारकोपर रेल्वे मार्गाच्या विलंबाविरोधात काँग्रेसचे गाजर दाखवा आंदोलन

उरण – खारकोपर रेल्वे मार्ग सुरू करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळी काँग्रेसने गाजर दाखवा आंदोलन केले.

सविस्तर वाचा…

14:01 (IST) 7 Dec 2023
ऑनलाईन हजेरीने शिक्षकांची डोकेदुखी वाढली; काय आहे कारण? वाचा सविस्तर…

अमरावती: गेल्‍या वर्षापासून राज्‍यभर गाजत असलेल्‍या पटसंख्‍येच्‍या मुद्यावर शिक्षण विभागाने शोधलेला ऑनलाईन हजेरीचा उपाय शिक्षकांसाठी मात्र डोकेदुखी ठरू लागला आहे.

सविस्तर वाचा…

13:50 (IST) 7 Dec 2023
“अहो भुजबळ, संवैधानिक पद आहे तर भाषणे सोडा अन् लोकांची कामे करा, नाही तर…” कोण देतोय असा सल्ला?

वर्धा: राज्यात मराठा आरक्षण आणि मंत्री छगन भुजबळ यांची त्याबाबतची भूमिका वादाची ठरली. तरीही नव्याने भुजबळ या विषयावर बोलले. त्याची दखल आमदार रोहित पवार यांनी घेतलीच. त्यांच्या नेतृत्वात निघालेली संघर्ष यात्रा आज जिल्ह्यात पोहचली.

सविस्तर वाचा…

13:48 (IST) 7 Dec 2023
दोन तासांचे काम अवघ्या ४० मिनिटांत, पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील वाहतूक वेळेआधीच सुरू

गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारची कामे करण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर अनेकदा ब्लॉक घेण्यात आलेला आहे.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 7 Dec 2023
नागपूर: शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घुसून चंदन चोरी, दुचाकी वाहनासह ५७ हजार रुपयांचा माल जप्त

नागपूर: शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यांसह इतर ठिकाणचे चंदन चोरी करणाऱ्या आरोपीस सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. तो मध्यरात्रीला बंगल्यात घुसून झाड तोडत होता आणि साथीदारांच्या मदतीने घेऊन जात होता.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 7 Dec 2023
धक्कादायक! आजारपणाला कंटाळून पत्नीचा खून, पतीची आत्महत्या

नागपूर: तीन महिन्यांपासून आजारी असलेल्या पत्नीचा पत्नी गळा दाबून खून करून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मौदा तालुक्यातील माथनी गावात घडली. सविस्तर वाचा…

13:29 (IST) 7 Dec 2023
हिवाळी अधिवेशन सुरू झाले तरी पावसाळी अधिवेशनातील घोषणा हवेतच; पिंपरी- चिंचवडकरांकडून ४७ कोटी सेवाशुल्क वसूल

महापालिकेने पूर्वलक्ष्यी प्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीच्या स्थगितीची राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात केलेली घोषणा हिवाळी अधिवेशन आले, तरी हवेतच राहिली.

सविस्तर वाचा…

13:18 (IST) 7 Dec 2023
पुणे : गावांचे पालटले रूप! पाबळ परिसरारील ११४ गावे झाली स्वयंपूर्ण

पाबळ परिसरातील ११४ गावांना स्वयंपूर्णतेचे धडे देण्याचा उपक्रम श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने हाती घेतला आहे.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 7 Dec 2023
हल्ला बोल मोर्चा सत्ताधाऱ्यांची झोप उडवणार, कोण करतंय दावा?

वर्धा: काँग्रेसतर्फे ११ डिसेंबरला नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा नेण्यात येणार असून यात विदर्भातून एक लाखावर कार्यकर्ते सहभागी होणार आहे.

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 7 Dec 2023
आता तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही… राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

तलाठी कार्यालयात न जाताही या सेवांचा लाभ गावकऱ्यांना घेता येणार आहे.

सविस्तर वाचा…

12:54 (IST) 7 Dec 2023
राज्यपाल आठवडाभर विदर्भात, काय आहेत कार्यक्रम?

नागपूर: राज्यपाल रमेश बैस हे गुरूवार ७ ते १३ डिसेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे या काळात नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असणार आहे.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 7 Dec 2023
वसईतील गावे वगळण्याच्या प्रकरणाला नवी कलाटणी, गावे महापालिकेत ठेवण्याची शासनाची भूमिका

वसई : वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना राज्य शासनाने अचानक पणे गावे महापालिकेतच असावे अशी भूमिका घेतल्याने नवीन कलाटणी मिळाली आहे.

वाचा सविस्तर…

12:39 (IST) 7 Dec 2023
उरणच्या बाजारात वालाच्या शेंगा; खवय्यांना थंडीत पोपटीची चाहूल

उरण: बाजारात सध्या वालाच्या शेंगा येऊ लागल्या असून खवय्यांना पोपटीची चाहूल लागली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामातील वालाच्या शेंगांच्या पोपट्या सुरू होणार आहेत.काही ठिकाणी पोपट्यांना लागू लागल्या आहेत.

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 7 Dec 2023
नवी मुंबई : तरुणीवर जीवघेणा हल्ला, आरोपीस अटक

दोघीही परीक्षा संदर्भात बोलत असताना अचानक हातात काचेची बाटली घेऊन एक व्यक्ती आला आणि त्याने बाटलीने निशाला मारहाण सुरु केली.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 7 Dec 2023
Maharashtra Assembly Winter Session 2023: शोक प्रस्तावानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. शोक प्रस्तावानंतर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. शुक्रवारी (८ डिसेंबर) दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल, अशी माहिती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

12:29 (IST) 7 Dec 2023
प्रेम एकीशी अन् लग्न दुसरीशी; विवाहित प्रियकराविरुद्ध…

नागपूर: इंस्टाग्रामवरून मैत्री झालेल्या युवकाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत बळजबरीने गर्भपात केला. मात्र, गावी जाऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केले. प्रियकराचे लग्न झाल्याची माहिती मिळताच प्रेयसीने बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसात केली.

सविस्तर वाचा…

12:26 (IST) 7 Dec 2023
Maharashtra Assembly Winter Session 2023: विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त उद्या सभागृहात चर्चासत्राचं आयोजन

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विधान परिषदेच्या सभागृहात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं विधानमंडळाच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे. यासाठी शुक्रवारी(८ डिसेंबर) विधान परिषदत सभागृहात आपल्याला विधान परिषदेचे विद्यमान सदस्य, नागपूर विधीमंडळ अधिवेशनाचे वार्तांकन केलेले ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र विधीमंडळाच्या संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचं महत्त्व’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.

12:11 (IST) 7 Dec 2023
‘एएएआय’च्या अध्यक्षपदी प्रशांत कुमार यांची पुनर्नियुक्ती

मुंबई: ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एएएआय) १ डिसेंबरला पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२३-२४ या वर्षासाठी प्रशांत कुमार यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ते ग्रुप एम मीडिया (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे दक्षिण आशिया विभागाचे मुख्याधिकारी आहेत. हवास इंडियाचे समूह मुख्याधिकारी राणा बरुआ यांची असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सहमतीने निवड करण्यात आली.

12:02 (IST) 7 Dec 2023
सातारा:उच्चपदस्थ अधिकारी रमले पुस्तकांच्या गावा, ‘भिलार’ची राज्यातील अधिकाऱ्यांना भुरळ

वाई : नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निबंधक आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ शिक्षण उपसंचालक यांना बुधवारी पुस्तकाच्या गावाने अक्षरशः भुरळ घातली. हे उच्चपदस्थ अधिकारी दिवसभर या गावी रमले. निमित्त होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित क्षेत्रभेटीचे!

11:52 (IST) 7 Dec 2023
‘समृद्धी’ प्रवासी, चालकांसाठी त्रासदायक! महामार्गांवर चोऱ्या, लूटमार; बांधकाम मंत्र्याचा…

वाशिम: मोठया थाठात सुरु करण्यात आलेला समृद्धी महामार्ग अल्पावधितच प्रवासी, चालकांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 7 Dec 2023
“शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०” विधिमंडळ परिसरात विरोधकांची घोषणाबाजी, गळ्यात संत्री- वांग्याची माळ घालून…

नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०” म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 7 Dec 2023
कराडजवळ अचानक पेटलेली खासगी आराम बस जळून खाक, नशीब बलवत्तर म्हणूनच ५५ प्रवासी बचावले

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ खाजगी आराम बसला काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत ही आराम बस जळून खाक झाली तर लाखो रुपयांचे नुकसान होताना दुसरीकडे मात्र सुदैवाने आराम बसमधील सर्व ५५ प्रवासी बचावले.

वाचा सविस्तर…

11:28 (IST) 7 Dec 2023
एक कार्यालय अन् दोन गट; राष्ट्रवादीतील फुटीचे अधिवेशनात पडसाद

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद तापला आहे. विधिमंडळ परिसरात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील शरद पवार गटाचे प्रत्युत्तर असणारे जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची लावण्यात आलेली पाटी काही तासातच पुन्हा काढण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 7 Dec 2023
नवाब मलिक विधान भवनात पोहचले; मलिक म्हणतात…

नागपूर: विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाकडे गेलेल्या विधानसभा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी मंत्री नवाब मलिक पोहचले. या प्रसंगी त्यांनी महत्वाचे भाष्यही केले.

सविस्तर वाचा…

नागपूर येथील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या गटात जाणार? याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. (संग्रहित फोटो)

Web Title: Maharashtra assembly winter session 2023 live updates from today at nagpur latest news in marathi rmm

First published on: 07-12-2023 at 10:39 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा