Mumbai News Today : देशभरात सध्या चर्चा आहे ती ऑपरेशन सिंदूर आणि त्याअनुषंगाने सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाची. महाराष्ट्रातूनही सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, आता या कारवाईतील काही मुद्द्यांवर विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे भारत-पाकिस्तान मुद्दा राज्यात चर्चेत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Live Updates

Mumbai-Pune News Live Today 12 May 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर

22:53 (IST) 12 May 2025

लवळेकर, मोहाडीकर यांना तळवलकर ट्रस्टचे पुरस्कार

पुणे: कृ. ब. उर्फ अण्णा तळवलकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ज्ञान प्रबोधिनी मानसशास्त्र संस्थेच्या संचालक व ज्येष्ठ मानसशास्त्र संशोधिका डॉ. अनघा लवळेकर यांना समाजशिक्षक पुरस्कार आणि कंझ्युमर शॉपी या व्यवसाय प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या मीनल मोहाडीकर यांना अनुकरणीय उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात रविवारी (१८ मे) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे श्रीकांत कुलकर्णी आणि चारुदत्त आलेगावकर यांनी सोमवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

22:13 (IST) 12 May 2025

आयुक्त निवासस्थानाबाहेर भाजपचे अनधिकृत कंटेनर कार्यालय!

शहरात मागील दोन वर्षांत शिवसेनेने पंधरा पेक्षा अधिक कंटेनर शाखा रस्त्याच्या कडेला व पदपथांवर उभारल्या आहेत. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही, राजकीय दबावामुळे कारवाई टाळल्याचा आरोप आहे. सध्या काही भागांत पुन्हा नव्या शाखांची उभारणी सुरू झाली आहे. ...वाचा सविस्तर
21:48 (IST) 12 May 2025

ऐतिहासिक वसई किल्ल्याचा २८७ वा विजयोत्सव जल्लोषात

वसई विरार महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे २८७ वा विजयोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. सोमवारी सकाळी वज्रेश्वरी मंदिरातून निघालेल्या मशाल यात्रेने या विजयोत्सवाला प्रारंभ झाला होता. ...वाचा सविस्तर
21:29 (IST) 12 May 2025

हिंदू देवीदेवतांची अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमावर, विकृताला महाराष्ट्र सायबर विभागाकडून अटक

हिंदू देवी देवतांची अश्लील छायाचित्रे तसेच अश्लील चित्रफिती तयार करून समाजमाध्यमावर पसरवणाऱ्या विकृताला अखेर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अटक केली आहे. ...अधिक वाचा
21:14 (IST) 12 May 2025

तारापूर अणुशक्ती केंद्र परिसरात लोकसंख्या, औद्योगिकीकरण, अनधिकृत बांधकामांचे प्रश्न

केंद्राच्या १.६० किलोमीटर परिसरात (एक्सक्लूजन झोन) कोणत्याही प्रकारची वसाहत अपेक्षित नाही. तर पाच किलोमीटरच्या परिघात मर्यादित वाढ अपेक्षित असून या महत्त्वपूर्ण बाबीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ...वाचा सविस्तर
21:00 (IST) 12 May 2025

नागपूरच्या ठकसेनाला अखेर अटक, कांदिवलीच्या व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक

व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या साई ॲग्रीम कॉर्पोरेशन या कंपनीच्या राहुल जैन याच्याविरोधात आणखी एक फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...अधिक वाचा
20:55 (IST) 12 May 2025

कोल्हापुरात काँग्रेसच्या बैठकीला ३४ माजी नगरसेवकांची उपस्थिती

कोल्हापूर: कोल्हापूर काँग्रेसमधील एक गट शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीला मावळत्या सभागृहातील ३४ माजी नगरसेवकांनी हजेरी लावली. काँग्रेससोबत एकनिष्ठपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह काँग्रेसचे काही माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. तातडीने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची एक बैठक एका हॉटेलमध्ये आयोजित केली होती.

त्याला मावळत्या सभागृहातील ३४ सदस्यांनी उपस्थिती लावली. त्यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक लढवून महापालिकेवर सत्ता मिळवली जाईल, असा निर्धार बोलून दाखवला.

या सदस्यांची भेट घेऊन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी संवाद साधला.

या बैठकीस शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, दिलीप पोवार हे अनुपस्थित होते.

19:19 (IST) 12 May 2025

Aaditya Thackeray on Kashmir Conflict : "काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही", मोदींच्या भाषणाआधीच आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचवेळात जनतेशी संवाद साधणार आहेत. त्याआधीच आदित्य ठाकरे यांनी काश्मीर मुद्द्यावरून पोस्ट केली. ...वाचा सविस्तर
18:33 (IST) 12 May 2025

काजू उत्पादनात कोकण क्रांती करेल; पालकमंत्री डॉ. उदय सामंत

ब्राझीलप्रमाणे कोकण देखील काजू उत्पादनात क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी नव नवीन प्रयोग करावेत, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. ...अधिक वाचा
18:33 (IST) 12 May 2025

माजी आमदार रमेश कदम लवकरच शिवसेनेत दाखल होणार? पालकमंत्री उदय सामंत यांच्या ऑपरेशन टायगरचे पुढील टार्गेट रमेश कदम 

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत चिपळूण दौऱ्यावर आले असता लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची माजी आमदार रमेश कदम यांच्याबरोबर भेट झाली. ...सविस्तर बातमी
17:27 (IST) 12 May 2025

Satara Prasad Kale News : लग्न लागलं, पूजा झाली, पण ओल्या हळदीच्या अंगानेच जवान सीमेवर दाखल; नववधू म्हणते, "मी स्वतःला..."

Satara Soldier Story | साताऱ्यातील खटाव तालुक्यातील काळेवाडी गावचा जवान प्रसाद काळे यांनाही ओल्या अंगानेच सीमेवर जावं लागलं आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नी वैष्णवी यांनी अत्यंत भावूक पण प्रत्येक महिलेला अभिमान वाटेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...सविस्तर बातमी
16:35 (IST) 12 May 2025

Sanjay Shirsat on Sharad Pawar: संजय शिरसाट यांचं शरद पवारांबाबत सूचक विधान...

भविष्यात शरद पवार महायुतीत येतील का? अजित पवारांसोबत जातील का? अजित पवार राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील का? हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा असेल. अजित पवार व शरद पवारांना आधी एकत्र येऊ द्या. नंतर ते काय समीकरण मांडतात ते बघू. पण भाजपा व शिवसेनेची युती पक्की आहे. त्यात कुठेही मतभेद नाहीत - संजय शिरसाट

16:31 (IST) 12 May 2025
Sanjay Shirsat on UBT: संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरे गटावर टीका

उबाठा गटाच्या लोकांनी केलेली युती चुकीची होती याचा प्रत्यय आता त्यांना यायला लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहणार नाही हे आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो. त्यांचं भविष्य अंधकारमय होत चाललेलं असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट कौटुंबिक आहे. ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रकारचे संकेतही आहेत. गेल्या चार महिन्यांत काँग्रेस उद्धव ठाकरे गटासोबत नाहीये. त्यांची एकही बैठक झालेली नाही - संजय शिरसाट

15:47 (IST) 12 May 2025

वसईतील दांपत्याचा फिलीपिन्स येथील अपघातात मृत्यू, फादरांना जखमी अवस्थेत असताना फोन केल्याने घटना उघड

शनिवारी सकाळी बाडीयान येथे जेराल्ड आणि प्रिया दुचाकीवरून जात असताना एका फिलिपिनो येथील ट्रक चालकाने ओव्हर टेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेमुळे त्यांची दुचाकी सिमेंटच्या विद्युत खांबाला धडकली. ...सविस्तर बातमी
15:46 (IST) 12 May 2025

मुंबई नाशिक महामार्गालगत पान-टपऱ्या, दुकानांत अमली पदार्थांचा साठा

मुंबई नाशिक महामार्गालगतच्या पान-टपऱ्या आणि चायनिज खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...वाचा सविस्तर
15:28 (IST) 12 May 2025

पालघर : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढला, तलासरी भागात बिबट्याचा हल्ला

गेल्या १४ दिवसापासून तलासरी तालुक्यामध्ये करजगाव आणि धामणगावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यासह वन विभागाचा कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर गुजरात मधील वलसाड येथे उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...सविस्तर बातमी
15:09 (IST) 12 May 2025

सिन्नर तालुक्यात तीन बिअर दुकानांमध्ये चोरी, सराईत गुन्हेगार ताब्यात

एकाच परिसरात तीन बिअर बारमध्ये चोऱ्या झाल्याने तीन गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता, संशयितांनी सीसीटीव्हीची डीव्हीआर यंत्रणादेखील चोरल्याने घटनास्थळावर कुठलाही पुरावा उपलब्ध नव्हता. ...सविस्तर बातमी
14:49 (IST) 12 May 2025

हेडगेवार रुग्णालयातील सांघिक भावनेचा ‘ एम्स’ साठीही उपयोग; अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांना विश्वास

छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात सांघिक पध्दतीने काम करण्याचा अनुभव पाठीशी असल्याने नागपूर येथील 'एम्स’चे संचालन करताना तो अनुभव कामाशी येईल असे मत नागपूर ‘ एम्स’ चे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांनी येथे येथे सांगितले. ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 12 May 2025

बियाणे, खते विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके कारवाईचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर

बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून जालना जिल्हयात नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ...अधिक वाचा
14:34 (IST) 12 May 2025

"मुंबईला सातत्याने…" राज्य सरकारची लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वाची चर्चा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत भारतीय लष्कराचे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, भारतीय नौदलाचे महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, भारतीय हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे डीजीपी, गृह आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...वाचा सविस्तर
14:34 (IST) 12 May 2025

महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

गुजरात वाहिनीवर प्रवास करणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन मुंबई वाहिनीवर येऊन प्रवासी वाहनाला धडकून भीषण अपघात झाला आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत. ...वाचा सविस्तर
14:18 (IST) 12 May 2025

पुण्यात ‘आरपीआय’ मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी?

हा निर्णय शहराध्यक्ष संजय सोनावणे, तसेच परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, महेंद्र कांबळे अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. ...वाचा सविस्तर
14:15 (IST) 12 May 2025

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची बैठकीनंतर प्रतिक्रिया

नागरी सुरक्षेच्या संदर्भात आज एक बैठक घेण्यात आली. सध्याच्या युद्धजन्य स्थितीत महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांची आपण बैठक घेतली होती. पण सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांशी आपण बैठक घेतली नव्हती. आजच्या बैठकीत या दिवसांमध्ये आपण अधिक काय करायची गरज आहे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे आणि आत्ताही आपण कसं सतर्क राहायला हवं यादृष्टीने सैन्यदलाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजून घेतलं.

आपण जिंकू शकत नाही हे पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळे ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संवेदनशील आहे. त्या दृष्टीने काय खबरदारी घ्यायला हवी, यासाठी आजची बैठक आम्ही घेतली.

14:01 (IST) 12 May 2025

DCM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी नागरी-लष्करी समन्वयासाठी बोलावलेली बैठक संपली

यापूर्वीदेखील राज्य सरकारच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसोबत बैठक झाली होती. पण आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती. सिव्हिल डिफेन्स, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, कोस्ट गार्ड यांच्यासोबत या बैठकीत चर्चा झाली. समन्वयासंदर्भात चर्चा झाली. सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. सरकारच्या वतीने आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्डला हवी ती सर्व मदत दिली जाईल असं सरकारनं सांगितलं आहे - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

13:13 (IST) 12 May 2025

CMO Maharashtra Post: २०२३ पर्यंत ३८ गिगावॅट वीजनिर्मितीचं लक्ष्य

महाराष्ट्रात २०३० पर्यंत ३८ गिगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून त्यासाठी सरकारकडून ३.३ लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून तब्बल ७ लाख नवे रोजगार निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1921827273428119781

12:03 (IST) 12 May 2025

कल्याण रेल्वे स्थानक भागात खाजा कोयता गुंडाची दहशत; महिलेसह नागरिक, दुकानदार यांना कोयत्याने मारण्याची धमकी

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील दीपक हाॅटेल परिसरात शनिवारी रात्री अकरा वाजता एका कुख्यात गुंडाने हातात धारदार कोयता घेऊन एका महिलेला पैशाची मागणी करून धमकावले. ...अधिक वाचा
11:41 (IST) 12 May 2025

जलवाहिनी फुटल्याने कळवा, दिवा, मुंब्रा भागाचा पाणी पुरवठा बंद; ऐन उन्हाळ्यात नागरिकांपुढे पाणी टंचाईची समस्या

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील अशुद्ध पाण्याची वाहिनी तुटल्यामुळे कळवा, दिवा, मुंब्रा भागाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
11:31 (IST) 12 May 2025

लग्न करण्याची तयारी दर्शवून कल्याणमधील तरूणाला तरूणीने घातला ३९ लाखाचा गंडा

ऑनलाईन वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून उपवर वधूचा शोध घेत असताना, तरूणाला शादी डाॅट काॅम या वधू वर सूचक मंडळाच्या ऑनलाईन व्यासपीठावर एका तरूणीशी ओळख झाली. ...सविस्तर बातमी
11:03 (IST) 12 May 2025

"इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे झाल्यानंतरच…", रोहित पवारांची पोस्ट; भारत पाकिस्तान शस्त्रविरामानंतर चर्चा!

India Pakistan War 1971: भारत व पाकिस्तानदरम्यान १९७१ साली झालेल्या युद्धातून बांगलादेशचा जन्म झाला. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. ...सविस्तर बातमी
11:00 (IST) 12 May 2025

वाळूवरून भाजप आमदरांमध्ये वाकयुद्ध

नागपुरात दोनच दिवसापूर्वी झालेल्या खनिज निधीबाबतच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्याच उपस्थितीत भाजपच्याच दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध रंगले. ...सविस्तर बातमी

cm Devendra fadnavis and sharad pawar

मुख्यमंत्री फडणवीस-शरद पवार आज एका व्यासपीठावर (File Photo)

Mumbai-Pune News Live Today 12 May 2025 : महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी संदर्भातील घडामोडींचा आढावा...