मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सत्ता स्थपानेनंतर ३९ दिवसांनी पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्नी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचा उल्लेख करत टीका केली आहे.

नक्की वाचा >> “संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…”; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अंजली दमानिया यांनी ट्विटरवरुन संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांची नावं मंत्रिमंडळात पाहून वाईट वाटल्याचं म्हटलं होतं. “दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रीपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रीपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी”, असं दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “शिंदेंच्या मंत्रिमंडळात नसणाऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिवस’ आलेत”; ‘त्या’ आमदाराचा खोचक टोला

या ट्विटनंतर काही तासांनी दमानिया यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लत्ना शिंदे आणि फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत राठोड यांच्या मंत्रीपदावरुन ट्विट केलं. “संजय राठोड यांना मंत्री बनवलं यावर मीडियाने सौ. लता एकनाथ शिंदे अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया घेतली पाहिजे. खरं तर अशी किळसवाणी लोकं राजकारणात राहूच दिली नाही पाहिजे. सगळ्या स्त्रियांनी मिळून याचा तीव्र निषेध करायला हवा,” असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

अन्य एका ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातील एका प्रसंगावरुन टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री शिंदे, आनंद दिघे यांचे शिष्य न तुम्ही? त्यांचा हयातीत, तुम्ही अशा एका माणसाचे काय केले हे दाखवलं ते फक्त पिक्चर पूर्त होतं का?” असा प्रश्न अंजली दमानियांनी उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> “स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…”; शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पाहून सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करत नोंदवली प्रतिक्रिया

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटामधील कथानकामध्ये बलत्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या एका तरुणीने आई-वडील आनंद दिघेंकडे न्याय मागण्यासाठी येतात. त्यावेळी बलात्काराची सगळी घटना ऐकून आनंद दिघेंसोबत काम करणारे एकनाथ शिंदे संतापून या बलात्काऱ्याला धडा शिकवण्यासाठी हॉकी स्टीक घेऊन धावून जाताना दाखवण्यात आलेत. याच प्रसंगावरुन हा टोला दमानिया यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet expansion anjali damania tweet on sanjay rathod with mention of eknath shinde wife and amruta fadanvis scsg
First published on: 09-08-2022 at 17:39 IST