मनसे मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याने सध्या पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. बुधवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील स्थितीचा आढावा घेतला असून पोलिसांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! इतर राज्यातील लोक येऊन महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात; गुप्तचर विभागाचा अलर्ट

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याचे आदेश दिले. तसंच कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका असंही सांगितलं आहे.

मनसे नेते महेश भानुशाली यांना अटक; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर घडामोडींना वेग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनवरुन चर्चादेखील केली. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.

रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं –

“गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,” अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली.

“राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा”

“सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणं पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही ते बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं मी राज्यातील जनतेला आवाहन करतो,” असंही ते म्हणाले.

एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात

“कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.

१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm uddhav thackeray ordered police not wait for anyones order sgy
First published on: 03-05-2022 at 17:14 IST