वि.का.राजवाडे संशोधन मंडळाच्या सहा ऐतिहासिक ग्रंथाचे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रकाशन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. "महाराष्ट्रात एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म होतो, तेव्हाच शिवप्रेम त्याच्या रक्तात भिनलेलं असते," असं उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितलं. "वि.का.राजवाडे संशोधन मंडळासारखी संस्था इतके वर्षे टिकवण्यात आली आहे. त्यामार्फत समाजाला उपयोगी येतील, असे विषय निवडून पुस्तक प्रकाशन करण्यास धाडस लागते," असे कौतुकही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हेही वाचा : “उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अन्…”, भाजपा मंत्र्याचं आव्हान उद्धव ठाकरे म्हणाले, "का… कोणास ठाऊक मला वाटले की आकाशातून दुर्ग पाहावे. कारण, नेहमी बोललं जातं, इतरांना भूगोल आणि महाराष्ट्राला इतिहास आहे. त्यामुळे दुर्गांच्या जागा कशा निवडल्या गेल्या? बांधणी कशी झाली? हे पाहण्याची मला इच्छा होती. त्यानंतर राजगडाची तटबंदी पाहिली आणि फोटो काढले." "हेलिकॉप्टरमधून उड्डाण केल्यावर कल्पना करवत नव्हती की, राजगडाची तटबंदी कशी बांधली असेल? आपल्याकडं एखाद्या इमारतीचे काम करायचे असल्यास टॉवर्सची उभारणी केली जाते. पण, त्याकाळी एवढे मोठे दगड कुठून आणि कसे आणले असतील? त्याला आकार कसा दिला असले? जर कुठे पाय सरकला की सरळ दरीत, असा थरारक क्षण होता," असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हेही वाचा : प्रियंका चतुर्वेदींबाबत संजय शिरसाटांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा…” "मला त्या दुर्गांकडे पाहताना वाटते की, दुर्ग जर बोलायला लागले तर काय होईल? दुर्गांना काहीतरी सांगायचे आहे, असं मला नेहमी वाटते," असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.