लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापुरात सुरू असलेल्या रणजी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने मणिपूरवर मजबूत पकड बसविली, अंकित बावणे याने केलेल्या दीड शतकी खेळीमुळे महाराष्ट्राला दुसऱ्या दिवसाअखेर मणिपूरवर ९८ धावांची आघाडी घेता आली.

Meeting of Uddhav Thackeray and Sharad Pawar along with Narendra Modi on Monday in Solapur
सोलापुरात सोमवारी एकाच दिवशी नरेंद्र मोदींसह उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या सभा
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा महाराष्ट्र संघाची धावसंख्या ३ गडी बाद १२३ अशी होती. कर्णधार केदार जाधव ४९ धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा, अंकित बावणे व केदार जाधव यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्याच सत्रात मोठा झटका मणिपूर संघाने दिला. कर्णधार केदार जाधव याने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याला ५६ धावांवर बिश्र्वोरजित याने बाद केले. त्यानंतर अंकित बावणे वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला चमक दाखविता आली नाही. जेवणाच्या वेळेपर्यंत महाराष्ट्र संघाने ९ बाद २९७ धावा केल्या. यात अंकित बावणे याने नाबाद १३२ धावा केल्या होत्या. जेवणानंतर अंकित बावणे याने आपले १५० धावा पूर्ण करून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. १५३ धावा केल्यानंतर त्याने आपली विकेट गमावली.

आणखी वाचा-‘मराठा समाजाचं आंदोलन अरबी समुद्रात बुडवू’, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे प्रतिआव्हान

महाराष्ट्र संघाने ८१.२ षटकांत डाव आटोपताना ३२० धावा करून १८३ धावांची आघाडी मिळविली. संघासाठी सिद्धेश वीर (५८) आणि कर्णधार केदार जाधव (५६) यांनी धावांचे योगदान दिले. मणिपूर संघाकडून बिश्र्वोरजित याने ७७ धावा देत ४ बळी टिपले .त्याला किसन संघा ३ व अजय सिंह याने २ बळी घेत साथ दिली. मणिपूर संघाची दुसऱ्या डावात पडझल सुरुवात झाली. ३१ धावांवर एकापाठोपाठ दोन बळी तंबूत परतले. पडले .दोन्ही सलामी फलंदाज करणजित (१६)) व बी रहमान (१५) धावांवर बाद झाले.

महाराष्ट्र संघाकडून हितेश वाळुंज व विकी ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यानंतर नितेश व जॉन्सन यांनी तिसऱ्या गडीसाठी ४८ धावांची भागीदारी केली. नीतेश याला २६ धावांवर हितेश वाळुंज याने यष्टिरक्षक निखिल नाईक याच्याकरवी झेलबाद केले . त्यापाठोपाठ जॉन्सन यालासुध्दा हितेश वाळुंज यानेच २३ धावांवर यष्टिरक्षक निखिल नाईकच्या मदतीने यष्टीचित केले .दुसऱ्या दिवसआखेर मणिपूर संघाची धावसंख्या ४ बाद ८५ धावा अशी झाली.