Maharashtra HSC 12th Result 2019 Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज  (मंगळवारी) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ८५. ८८ टक्के इतका असून यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी १ पासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. राज्यभरातून बारावीच्या परीक्षेत १४ लाख २३ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती. परीक्षेत १४ लाख २४ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती. यात मुलींची संख्या ६ लाख ३० हजार २५४ तर मुलांची संख्या ७ लाख ९१ हजार ६८२ इतकी होती. यातील १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा निकाल ८५. ८८ टक्के इतका लागला आहे.

गुण पडताळणीसाठी २९ मे ते ७ जून आणि छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून या या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.

Maharashtra Board HSC 12th Result 2019: LIVE Updates

Live Blog

13:09 (IST)28 May 2019
शाब्बास! आयपॅडवर परीक्षा देत दिव्यांग निष्काने मिळवले ७३ टक्के

मुंबईतील सोफिया कॉलेजमध्ये शिकणारी निष्का होसंगडीला दुर्धर आजाराने ग्रासले, आठ वर्षांची असताना तिच्या उजव्या हाताची हालचालही बंद झाली, तिची वाचाही गेली… पण निष्का खचली नाही, तिने जिद्दीच्या आधारे निष्काने शिक्षण सुरुच ठेवले, आधी दहावी आणि यंदा बारावीत निष्काने यश मिळवले आहे…वाचा सविस्तर>>

13:09 (IST)28 May 2019
बारावीच्या निकालाची पत्रकार परिषद

13:07 (IST)28 May 2019
बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना  www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. 

13:01 (IST)28 May 2019
शाखा निहाय उत्तीर्णतेची माहिती.

12:54 (IST)28 May 2019
मुंबईची पोरं हुशार

बारावीच्या परीक्षेत मुंबईतील ३ लाख १६ हजार ३४५ विद्यार्थी बसले होते. यातील ३४, ५४३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे. पुण्यातील १८ हजार १३२ तर औरंगाबादमधील १० हजार ३६८ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. कोकण विभागातील २, ०५२ विद्यार्थ्यांनी, लातूरमधील ५, ७६२ विद्यार्थ्यांनी, नागपूरमधील ६, ९०१ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

11:35 (IST)28 May 2019
iPAD वर परीक्षा देऊन मिळवले ७३ टक्के

मुंबईच्या सोफीया कॉलेजची विद्यार्थ्यिनी निशिका ही iPad वर परिक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी ठरली असून ती उत्तीर्ण झाली आहे. तिला ७३ टक्के मिळाले आहेत. यंदा पहिल्यांदाच २२ प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी होते.  दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२. ६० टक्के इतका लागला आहे.

11:30 (IST)28 May 2019
यंदा २.५३ टक्क्यांनी निकाल घसरला

विज्ञान - ९२.६० (२०१९)        ९५.८५ (२०१४)

कला - ७६.४५  (२०१९)       ७८.९३ (२०१४)

वाणिज्य       ८८.२८ (२०१९)       ८९.५०(२०१४)

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम- ७८.९३ (२०१९)         ८२.१८ (२०१४)

11:27 (IST)28 May 2019
विभागनिहाय निकाल

पुणे - ८७. ८८ टक्के
नागपूर - ८२.५१ टक्के
औरंगाबाद - ८७.२९ टक्के
मुंबई - ८३. ८५ टक्के
कोल्हापूर- ८७.१२ टक्के
अमरावती- ८७.५५ टक्के
नाशिक- ८४.७७ टक्के
लातूर- ८६. ०८ टक्के
कोकण- ९२.२३ टक्के

11:25 (IST)28 May 2019
शाखानिहाय निकाल

विज्ञान शाखेचा निकाल ९२.६० टक्के, कला शाखेचा निकाल ७६.४५ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ८८.२८ टक्के लागला आहे. 

11:22 (IST)28 May 2019
बारावीच्या निकालात घसरण

राज्याचा निकाल ८५.८८ टक्के असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.५३ टक्क्यांनी निकाल घसरला. एकूण १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील ४ हजार ४४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.  वाचा सविस्तर>>

11:18 (IST)28 May 2019
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा

यंदाही बारावीच्या परीक्षेत कोकणनेच बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल ९३. २३ टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.  नागपूर विभागाचा निकाल ८२. ५१ टक्के इतका लागला. 

11:16 (IST)28 May 2019
यंदाही मुलींची बाजी

परीक्षेत १४ लाख २३ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती.  यात मुलींनीच बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०. २५ टक्के असून मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८२. ०४ टक्के इतके आहे. 

11:13 (IST)28 May 2019
पुण्यात बोर्डाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

पुण्यात बोर्डाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात, राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी यंदा बोर्डाने परीक्षेच्या कालावधीत राबवलेल्या उपाययोजनेची माहिती दिली.

10:59 (IST)28 May 2019
निकाल असा पाहा

असा पहा निकाल http://www.mahresult.nic.in

http://www.result.mkcl.org

http://www.maharashtraeducation.com

http://www.knowyourresult.com

hscresult.mkcl.org

संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. तसेच लघुसंदेशाद्वारेही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी MHHSC बैठक क्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर लघुसंदेश पाठवावा.