महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून बुधवारी दिल्लीतील संसद भवनात महत्वपूर्ण बैठक झाली. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने महाराष्ट्रसंबंधी वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. त्या बैठकीत हा मुद्दा अमित शाह यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. त्यावर, ते अकाउंट आपलं नव्हत, अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. तसेच, तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन बोम्मईंनी दिलं.

हेही वाचा : ‘भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का?’ – महाराष्ट्राच्या सीमेवर गुजरातच्या घुसखोरीवरून सचिन सावंतांचे टीकास्त्र!

यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “गेली १५ ते २० दिवस हा प्रश्न हा चिघळला जात आहे. मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅक झालं, तो शोध होईल. पण, खुलासा होण्यास एवढे दिवस का लागले. बेळगावातील मराठी बांधवांवर पोलीस कारवाई आणि महाराष्ट्रातील वाहनांना प्रत्यक्ष बंदी झाली होती. मग जर ट्वीटर हॅक झालं होतं, तर मुख्यमंत्री कार्यालय सजग आणि जागृत असायला पाहिजे, की आपल्या ट्वीटरवरून कोण काय बोलतं. तो खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना दोन्ही राज्यांनी काही करु नये, हा नवीन सल्ला नाही आहे.”

हेही वाचा : “देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र” – नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असताना बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला की, यापूर्वी दिला. विधानसभेच अधिवेशन आधीपासून सुरु आहे की, नंतर सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत केवळ महाराष्ट्राने थांबायचं का? या सर्व गोष्टींचा उहापोह नुसता ‘पोहे’ खाऊन निघणार असेल तर काही अर्थ नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.