Maharashtra Monsoon Session 2025 Updates, 14 July : उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना सोपवल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. आज विधीमंडळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार, विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय होणार का? याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. यासह जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाची देखील राज्यभर जोरदार बॅटिंग चालू आहे. यासह सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक बातम्यांच्या आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Latest Maharashtra News Live Today : राज्यासह देशभरातील सामाजिक व राजकीय बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
दवाखान्याबाहेर क्यूआर कोड; बोगस डॉक्टरांना आळा घालणार
नांदेडमधील गोळीबार; ९ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र
पावसाने पाठ फिरवली; शेतकऱ्यांपुढे ‘दुबार पेरणी’चे संकट
ऐन पावसाळ्यात मराठवाड्याच्या घशाला कोरड? जल जीवन मिशन फसले; मंत्र्यांनी दिलेली माहिती धक्कादायक
गर्भश्रीमंत एमआयडीसी तोट्यात; तोटा का झाला आणि किती कोटींचा?
‘तर्कतीर्थां’च्या कार्यावर उद्यापासून कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय परिषद
युतीसंदर्भात निवडणुकीवेळीच निर्णयाचे राज ठाकरेंकडून संकेत
‘एनईपी’च्या अंमलबजावणीबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; कोणत्या विद्यार्थ्यांना करावा लागणार सेतू अभ्यासक्रम?
बोगस पीकविमा भरल्यास पाच वर्षे नाव काळ्या यादीत
राव-शंकररावांमुळे अयोध्येत इतिहास घडला; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा नांदेडमध्ये गौप्यस्फोट
पाचवा दिवसही तोडग्याविना; रोजंदारी कर्मचाऱ्यांचा निर्धार कायम
राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी भाषेच्या मुद्द्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलेलं आहे. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत एक मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मात्र, याच भाषणात राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Supriya Sule : जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा; म्हणाल्या, "राजीनामा दिला असता तर..."
Supriya Sule On Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एवढंच नाही तर माध्यमांमध्ये देखील त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तसेच शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून लवकरच पदग्रहण करणार असल्याची देखील चर्चा आहे. पण या चर्चांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा खुलासा केला आहे. जयंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.दिला असता तर मी पाहिला असता.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षात काही संभ्रम सुरू आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला अशा बातम्या मी माध्यमांमध्ये पाहिल्या. मात्र, त्यांचा राजीनामा मी पाहिलेला नाही, वाचलेलाही नाही आणि त्यांनी राजीनामा दिला अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली देखील नाही, म्हणजे अर्थातच त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यांनी राजीनामा दिला असता तर मी पाहिला असता", असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
"ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर हे नक्कीच समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची आशा ही सर्वोच्च न्यायालयच आहे, जेथे या चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल. आमचं चिन्ह चोरलं गेलं आहे. कदाचित निवडणूक आयोगाला निवडणूकीचे चिन्ह देण्याचा अधिकार आहे, मात्र पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. तो निवडणूक आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कल्याणचे कासम शेख चौथ्यांदा ‘एआय’मधील मायक्रोसाॅफ्ट सर्वोत्कृष्ट पुरस्काराचे मानकरी
सटाण्यातील ऐतिहासीक मंदिरातील मूर्तीचे शास्त्रशुध्द संवर्धन - मिट्टी फाउंडेशनचा पुढाकार
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शिवप्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती . पण आरोपी विरोधात दाखल गुन्हा जामीन पात्र असल्याने कोणालाही अटक झाली नाही. मात्र आरोपीने पुन्हा एकदा असे कृत्य करू नये, म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.
समोसे, जिलेबी, लाडू सिगारेटच्या पंगतीत! तंबाखू विरोधासारखे लागणार फलक; सुरुवात नागपूरपासून?
अमेरिकेतही ‘हंडाभर चांदण्या’; ‘कॅलिफोर्निया आर्ट्स’च्या उपक्रमात दत्ता पाटील यांचा मराठीजनांशी संवाद
नाशिकमध्ये औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुर्दशा; छगन भुजबळ यांची दुरुस्तीची सूचना
जळगावात शरद पवार गटाला मविआतील ठाकरे गटाचा हादरा
महाराष्ट्रातील बारा अधिकारी झाले आयएएस; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती
"मनपूर्वक अभिनंदन!! महाराष्ट्रातील बारा अधिकारी झाले आयएएस महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने अधिसूचना जारी केली. महाराष्ट्र महसूल सेवेतील बारा अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले. मी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राचा महसूलमंत्री म्हणून, महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना नेहमीच मी प्रोत्साहन देत असतो. त्यांच्या गुणांचे कौतुक मी जाहीरपणे तर करतोच पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो. उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे; म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील अधिकाऱ्यांना मिळालेली शाबासकी म्हणजे आजची पदोन्नती होय. पुनश्च अभिनंदन !! " अशी पोस्ट भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे अधिकृत नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अंतरिम दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंबंधी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, यावेळी हा मुद्दा निकाली काढण्यासाठी ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. "आम्ही ऑगस्टमध्ये प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही याबद्दल संध्याकाळी माहिती देऊ," असे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले.
Amruta Fadnavis News: "पुणे हे देवेंद्रजींचं मूल आहे", अमृता फडणवीसांचं विधान; म्हणाल्या, "पुण्यात खूप समस्या…"
Loan App Scam : पाकिस्तानी क्रमांकावरून कॉल ते मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी; 'लोन अॅप'वरून 'अशी' होत असे फसवणूक
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; संजय राऊत म्हणाले...
धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. "धनुष्यबाण बेगायदेशीर पद्धतीने शिंदे गटाला देण्यात आला. कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं. निवडणूक आयोगाने पक्ष आधार घेतला नाही, तर विधिमंडळात त्यांचे बहुमत आहे, हा आधार घेतला. विधिमंडळातील त्यातले काही आमदार पराभूत झाले, लोकसभेतील त्यांचे खाही खासदार पराभूत झाले. ज्या विधिमंडळ पक्षाच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिला, त्यातील बहुसंख्य लोकं पराभूत झाले, मग तो आधार कुठे आहे? त्यामुळे नव्याने सुनावणी होऊन हे चिन्ह गोठवलं पाहिजे अशी मागणी पक्षाने केली आहे. धनुष्यबाण चिन्हावर त्यांचा काहीही अधिकार नाही," असे संजय राऊत म्हणाले आहेत.