Maharashtra Politics News Updates, 31 July 2025 : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय आज निकाल दिली आहे. यामध्ये देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या या खटल्यातून भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची सुटका होणार की त्यांना शिक्षा होणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.. याबरोबरच एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी झालेल्या अटक प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. राज्यातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता असून यासंबंधी घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

18:47 (IST) 31 Jul 2025

जिल्हा परिषद शाळा सीसीटीव्हीचे काम जलदगतीने करा – राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रशासनाला सूचना

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आता सुरक्षिततेची दृष्टीने महत्वाची पावले उचलली जाणार आहेत. ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा

17:51 (IST) 31 Jul 2025
सरकारने न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध अपील करावं, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज निकाल आलेला आहे, हा पूर्ण निकाल मला वाचता आलेला नाही पण प्राथमिक दृष्ट्या जे वाचलं त्यावरून सरकारी पक्षाला आरोपींवर संशयाच्या आधारावर दोषी सिद्ध करता आलेला नाही, अस कोर्टाने म्हटलेले आहे. आरोपींना बेनिफिट ऑफ डाऊटचा फायदा न्यायालयाने दिलेला आहे. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता न येणे चिंताजनक आहे. मालेगाव स्फोट झाला त्यात ज्यांचा मृत्यू झाला, जे जखमी झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि या प्रकरणातील जे सूत्रधार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अमर शहीद हेमंत करकरे यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. या स्फोटातील पीडितांना सरकारकडून न्यायची अपेक्षा आहे.

या स्फोटातील पीडितांना सरकारकडून न्यायची अपेक्षा आहे. पीडितांना न्याय मिळावा यासाठी सरकारने न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध अपील करावे..

17:04 (IST) 31 Jul 2025

बॉम्बस्फोट खटला निकालानंतर मालेगावात…

२००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांच्यासह एकूण सात जणांची मुक्तता झाल्यानंतर मालेगाव शहर आणि तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांना आनंदाचे भरते आले. ...वाचा सविस्तर
15:56 (IST) 31 Jul 2025

मालेगावमध्ये कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस अलर्ट मोडवर

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अतिरिक्त कुमक पोलिसांकडून मागविण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मालेगावच्या भिकू चौकात विशेष खबरदारी घेण्यात आली असून दोन दिवसापासून संशयित व्यक्ती आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसंदर्भात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील घेण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

15:16 (IST) 31 Jul 2025

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्ततेनंतर प्रसाद पुरोहित यांची प्रतिक्रिया म्हणाले, "या देशाने मला..."

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्त झालेल्यांपैकी ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी प्रतिक्रिया दिली आहे "या देशाने मला सेवा करण्याची संधी यापूर्वीही दिली, जामिनावर सुटल्यावरही दिला आणि यानंतरही मला संधी देत आहे याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. एक निर्दोष ठरल्यावर माझी इच्छा आहे की परमेश्वर आणि मातृभूमीने ही संधी प्रत्येकाला द्यावी आणि ते देत असतात.पण कमतरता आपल्यात असते की आपण त्याचा फायदा घेत नाहीत. त्यामेळे देशाचे काम कार, देश सोडून दुसरं काही नाही, अशा प्रतिक्रया निवृत्त कर्नल पुरोहित यांनी दिली," असे ते म्हणाले.

14:20 (IST) 31 Jul 2025
"न्यायपालिकेचा निर्णय सर्वांनी स्वीकारला पाहिजे," मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरील निकालानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

"मालेगाव येथे जी घटना घटली थी अप्रिय होती, सर्वांनीच त्याचा निषेध केला. जेव्हा न्यायपालिकेचा निर्णय येतो तो सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. अखेर आपण आपल्या संविधानाअंतर्गत न्यायपालिकेला महत्त्व देतो. आपले संविधान हेही सांगते की आपण कोणालाही धर्म आणि जातीच्या आधारावर ओळखत नाही आपण त्यांन फक्त भारतीय म्हणून ओळखतो. त्यामुळे आज जो निर्णय आला आहे तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

14:15 (IST) 31 Jul 2025

विश्लेषण : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात निर्दोष सुटलेले आहेत तरी कोण?

हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग झाल्यानंतर आता मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. ...सविस्तर बातमी
14:02 (IST) 31 Jul 2025

"मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला. आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी! हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे," अशी पोस्ट भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

13:56 (IST) 31 Jul 2025

धर्माचा आणि दहशतवादाचा संबंध नाही… मालेगाव निकालावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख स्पष्टच बोलले

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ...सविस्तर वाचा
13:37 (IST) 31 Jul 2025

Malegaon Bomb Blast Case Verdict Updates :फक्त २००८ नाही तर २००६ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही…

2008 Malegaon Bomb Blast Case Latest Updates : मालेगाव २००६ व २००८ बॉम्बस्फोट खटल्यातील संशयितांना निर्दोषत्व बहाल करण्याची पुनरावृत्ती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...सविस्तर वाचा
13:25 (IST) 31 Jul 2025

Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया.., म्हणाले, काँग्रेस सरकारने मुद्दामून धार्मिक…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष सोडले असू या निर्णयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ...सविस्तर बातमी
13:11 (IST) 31 Jul 2025

Malegaon Bomb Blast Case Verdict Updates: मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर संघभूमी तून पहिली प्रतिक्रिया, "हिंदू दहशतवाद हा..."

2008 Malegaon Bomb Blast Case Latest Updates: मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. ...सविस्तर बातमी
12:55 (IST) 31 Jul 2025

Malegaon Bomb Blast Case Verdict Updates : ‘हा अन्याय'… निकाल ऐकून दुःख झाले… मालेगावमधील पीडितांच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया

2008 Malegaon Bomb Blast Case Latest Updates : या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे मालेगावमधील प्रत्यक्षदर्शी व पीडितांचे नातेवाईक डॉ. अन्सारी अखलाक अहमद यांनी न्यायालयाबाहेर आल्यानंतर सांगितले. ...सविस्तर बातमी
12:50 (IST) 31 Jul 2025

"उशीरा का होईना, न्याय मिळाला," मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

न्यायालयाच्या निकालाचं स्वागत सगळ्यांनी केलं आहे. पण न्याय मिळायला उशीर झालाय. देर आए, दुरुस्त आए. उशीरा का होईना, न्याय मिळाला आहे. तेव्हा देशात यूपीएचं सरकार होतं. देशात मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट होत होते. तेव्हा यूपीए सरकारचं म्हणणं होतं की दहशतवादाला कुठलाही रंग नसतो. पण मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यावर सरकारने म्हटलं की हा भगवा दहशतवाद आहे. त्यात राजकारणाचा प्रयत्न केला. पण या प्रकरणाच्या राजकीयिकरणाला न्यायालयाने आजच्या निकालातून चपराक दिली आहे. भगवा दहशतवाद म्हणून हिंदुत्वाला या बॉम्बस्फोटाशी जोडलं गेलं.

जे घडलं ते दुर्दैवी आहे. आम्ही कोणत्याही दहशतवादाचं समर्थन करत नाही, करणारही नाही. न्यायव्यवस्थेवर आमता विश्वास आहे. दूध का दूध, पानी का पानी व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी दिली आहे.

12:44 (IST) 31 Jul 2025

सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेचे वीज आंदोलन; सत्यनारायण महापूजा व महाआरती करून देवाला साकडे घालणार

येत्या १० ऑगस्ट रोजी मळेवाड आणि १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सत्यनारायण महापूजा आणि महाआरती करून थेट देवालाच साकडे घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...वाचा सविस्तर
12:40 (IST) 31 Jul 2025

मालेगाव स्फोटामुळेच ‘भगवा दहशतवाद’ शब्द रुढ!

२००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॅाम्बस्फोटानंतरच देशात भगवा दहशतवाद हा शब्द रुढ झाला. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी खरे तर घटनास्थळी सापडलेल्या स्कूटरवरुना या प्रकरणाची उकल करीत ‘अभिनव भारत’ या कथित संघटनेचा हात असल्याचे उघड केले होते. ...वाचा सविस्तर
12:29 (IST) 31 Jul 2025

"आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!", मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

"आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!", मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

12:28 (IST) 31 Jul 2025

...म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खटला चालला.

न्यायालयाने साध्वी यांच्यावर दहशतवादाच्या आरोपाप्रकरणी आरोप निश्चित केले गेले व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. ...सविस्तर वाचा
12:20 (IST) 31 Jul 2025

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएचा दावा काय आणि आरोपींचा युक्तिवाद काय ?

दोन धर्मात तणाव निर्माण करण्यासाठी आणि राज्यातंर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी कट रचण्याच्या उद्देशाने स्फोट घडविण्यात आल्याचा युक्तिवाद एनआयएकडून कऱण्यात आला होता. ...सविस्तर वाचा
12:20 (IST) 31 Jul 2025

७/११ नंतर आता मालेगावमधील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; एटीएसच्या तपासाला दुसरा मोठा धक्का

उपनगरीय लोकलमध्ये झालेल्या  ७/११ स्फोटातील सर्व १२ आरोपींची निर्दोष सुटका झाल्यामुळे राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. ...वाचा सविस्तर
12:18 (IST) 31 Jul 2025

एटीएसच्या तपासावर एनआयएने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि…

१३ मे २०१६ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात, एनआयएने आरोपींवरील मोक्का हटवत असल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणी मोक्का लावण्याच्या राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. ...अधिक वाचा
12:06 (IST) 31 Jul 2025

बॉम्बस्फोट झाला तर आरोपी गेले कुठे?; काँग्रेसचा सरकारला सवाल

बॉम्बस्फोट झाला तर आरोपी गेले कुठे? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील, ते पकडले गेले पाहिजेत. यासंदर्भात सरकार काय करणार? हादेखील प्रश्न आहेच. शहीद हेमंत करकरे यांनी या प्रकरणात जे काही धागेदोरे शोधले होते, त्यांचं काय झालं? या सरकारची ही जबाबदारी आहे की या स्फोटातील आरोपींना शिक्षा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

12:02 (IST) 31 Jul 2025

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटला:साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर आरोपींवर आरोप काय होते ?

मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. ...वाचा सविस्तर
11:44 (IST) 31 Jul 2025

निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान देणार - पीडित कुटुंबाचे वकील

बॉम्बस्फोट झाल्याचे न्यायालयाने सिद्ध केले आहे. आम्ही या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात अव्हान देऊ. आम्ही तात्काळ याचिका दाखल करू, असे पीडितांच्या कुटुंबाचे वकील शाहिद नदीम म्हणाले.

11:35 (IST) 31 Jul 2025

'दहशतवादाला कोणताही धर्म नसतो पण...'; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींची निर्दोष मुक्तता

दहशतवादाला कोणताही धर्म नसतो पण नैतिकतेच्या आधारावर शिक्षा दिली जाऊ शकत नाही. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माजी भाजपा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व सातही आरोपींनी एएनआय न्यायालय निर्दोष मुक्त करते.

२९ सप्टेंबर २००९ रोजी नाशिकमधील मालेगाव येथे झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

11:26 (IST) 31 Jul 2025
Maharashtra Breaking News Live Updates : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, पुरोहित यांच्यासह सातही जणांची निर्दोष सुटका

पुरावे न आढळल्याने एनआयएच्या विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधून सर्व सातही जणांची निर्दोष सुटका केली आहे. पुराव्यांच्या आभावी ही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

11:21 (IST) 31 Jul 2025

आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणले हे सिद्ध होऊ शकलेले - न्यायालय

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल वाचनास कोर्टात सुरूवात झाली आहे. यामध्ये बॉम्बस्फोट झाला , मात्र मोटोरसायकलमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणले हे सिद्ध होऊ शकलेले नाही .... त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध नाही. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या मोटाईसायकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा आरोप, पण ही मोटारसायकल त्यांच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

11:10 (IST) 31 Jul 2025

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित NIA न्यायालयात दाखल; पाहा Video

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित एनआयए न्यायालयात दाखल झाले आहेत. १७ वर्षे जुन्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालय आज निकाल देणार आहे.

10:53 (IST) 31 Jul 2025
आज जगाला सत्य माहिती होईल- समीर कुलकर्णी

"१७ वर्षांपासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो, मला स्वतंत्र्य भारताच्या स्वायत्त, सार्वभौम विश्वसनिय न्यायायालयावर पूर्ण विश्वास आहे. आमच्या निर्दोषत्वावर न्यायालय ठप्पा लावेल. जे सत्य आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती होतं, तात्कालिन युपीए सरकारला माहिती होतं, तपास यंत्रणांना माहिती होतं, ते सत्य आज जगाला माहिती होईल," अशी प्रतिक्रिया मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

10:41 (IST) 31 Jul 2025

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल पुरोहितसह सातजणांचे भवितव्य ठरणार

मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. ...वाचा सविस्तर