Maharashtra Political Crisis Updates, 21 November 2022 : राहुल गांधींनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती, असा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली,” असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.
तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा मुद्दाही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Marathi News , 21 November 2022 : पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा दोन अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू; सातजण जखमी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांनी केलेल्या १० मोठ्या वक्तव्यांचा आढावा.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपाला घेरलं आहे. असं असतानाच आता शिंदे गटातील आमदारही या मुद्द्यावर आक्रमक झालेले बघायला मिळत आहे. बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी या मुद्द्यावरून शिंदे गट आणि भाजपात वितुष्ठ निर्माण होऊ शकतं, असा थेट इशारा दिला आहे. तसेच भाजपाच्या लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल विचार करून बोलावं, असंही म्हटलं. ते सोमवारी (२१ नोव्हेंबर) बुलढाण्यात पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
“सीमाप्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. याप्रश्नी महाराष्ट्रातील सर्व राजकिय पक्ष एकत्र आहेत. सनदशीर, लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्व जण सीमावासीयांबरोबर आहोत.”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...
कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक परंपरा असलेली शिक्षण संस्था राजाराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज स्थलांतर करण्याच्या मुद्द्यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात असंतोष वाढीस लागला आहे. बातमी वाचा सविस्तर...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी संजय पवारांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर 'बाप हा शेवटी बापच असतो' असं म्हणत जहरी टीका केली. ते सोमवारी (२१ नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये बोलत होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज्यपालांच्या फोटोला जोडे मारत त्यांचे फोटोही फाडण्यात आले.
बंडाळीनंतर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातील मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांची सर्वबाजूने चोहुबाजूने कोंडी करण्याची रणनीती शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) केली असली तरी यातून आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाठ हे टीका पिरघाच्या बाहेर असल्याचे चित्र दिसून येत आहे. बातमी वाचा सविस्तर...
कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले हेदेखील आक्रमक झाले आहेत. कोश्यारी यांचे वय झालेले आहे. आपण काय बोलत आहोत, हे त्यांना समजत नाही. राज्यपालांना कुठेतरी लांब फेकून दिले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर
बोरीवली येथील नॅन्सी काॅलनी रस्त्याची मालकी नुकतीच मुंबई महानगरपालिकेला मिळाली आहे. गेली १५ वर्षे नॅन्सी काॅलनीतील रस्त्याची मालकी खाजगी मालकाकडे होती. त्यामुळे या वसाहतीत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पालिकेला करता येत नव्हते. बातमी वाचा सविस्तर...
प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर काल पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. मागील काही दिवसांपासून आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू आहेत, असे म्हटले जात आहे. असे असतानाच हे दोन्ही नेते एकाच मंचावर आल्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचे तोंडभरून कौतूक केले आणि यासोबत युतीचे संकेतही दिले. उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर आज भाजपाने टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी...
पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाने ४८ वाहनांना धडक दिली. यानंतर या गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तपासादरम्यान यामागे दुसरं कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याची आज होणारी नार्को चाचणी रद्द झाली आहे. श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणारा आफताब पोलिसांनी वेगवेगळी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर पोलिसांनी नार्को चाचणीची मागणी केली असता दिल्ली कोर्टाने त्यासाठी परवानगी दिली होती. मात्र आज ही नार्को चाचणी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या क्रूर हत्येचं आणखी एक खुलासे उघड होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘काळी टोपी हटाव’ असा हल्लाबोल करत छत्रपती महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. बातमी वाचा सविस्तर...
स्वातंत्रवीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं वादग्रस्त विधान केलं होते. यासंदर्भातला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांच्या पत्राची तुलना शिवाजी महाराजांच्या पत्राशी करणं हा केवळ मुर्खपणा आहे, असे ते म्हणाले. तसेच भाजपाने यावर भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सुधांशू त्रिवेदी ज्या दिवशी महाराष्ट्रात येईल, चप्पलेने त्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. सविस्तर वाचा
नाशिक : नोव्हेंबरच्या उत्तरार्धात शहरात तापमान कमालीचे घसरले असून दिवसाही कमालीचा गारवा असल्याने सर्वत्र हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. सोमवारी ९.२ अंश या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मागील दोन वर्षात नोव्हेंबर महिन्यात पारा १० अंशाचा खाली आलेला नव्हता. यंदा या पातळीच्या खाली तापमान गेले आहे.
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) पालिका हद्दीतील बहुतांशी बस थांब्यांजवळ दुचाकी, खासगी चारचाकी वाहने, रिक्षा उभ्या करण्यात येत असल्याने केडीएमटीच्या चालकांची डोकेदुखी वाढली आहे. बस थांब्यावर नेण्यापूर्वी चालकाला बस मधून उतरुन थांब्या जवळ उभी केलेली दुचाकी बाजुला करुन मग बस थांब्यावर आणावी लागते. प्रवाशांनाही या घुसखोर वाहनांचा त्रास होत आहे. बातमी वाचा सविस्तर...
शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली. तसेच भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांकडे कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवण्याची आणि महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मराठी मातीतील माणूस असावा, अशी मागणी केली. ते सोमवारी (२१ नोव्हेंबर) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. फडणवीसांच्या याच भूमिकेवर आता उद्धव ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयीचे प्रेम खरे नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे. ते आज (२१ नोव्हेंबर) सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर
उद्धव ठाकरे गटानेदेखील राहुल यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असे स्पष्ट केलेले आहे. विशेष म्हणजे अशा वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी संपुष्टात येऊ शकते, असा इशाराही ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी दिला आहे. असे असतानाच आता राहुल गांधी यांनी राऊतांना थेट फोन केला आहे. या विषयी खुद्द संजय राऊतांनी माहिती दिली आहे. ते आज (२१ नोव्हेंबर) सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा. तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. उद्धव ठाकरे गटदेखील आक्रमक झाला असून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. वाचा सविस्तर
पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या ४३व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली होती. तसेच भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही टीका करत त्यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. दरम्यान, या टीकेवर आता सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. टीका करणं चुकीचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या विधानाचाही निषेध केला. सविस्तर वाचा
जळगाव /जामोद: आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत आहे. बातमी वाचा सविस्तर...
ठाणे : चमचमत्या चांदण्याच्या, आकाशाच्या सानिध्यात मेजवानीचा आस्वाद घेण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण, मुंबई-ठाणे परिसरातील पहिले हवेत तरंगणारे उपाहारगृह सुरू झाले आहे. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात पाचशे ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर उपलब्धतेनुसार ओळखपत्रांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, बंद असलेली बायोमॅट्रिक्स यंत्रणाही महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर...
बदलापूर: नोव्हेंबरमध्ये गेल्या १० वर्षात बदलापूर शहरातील सर्वात कमी तापमानाची नोंद मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी झाली. सोमवारी सकाळी ७ वाजल्याच्या सुमारास बदलापुरात १०.३ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. बातमी वाचा सविस्तर...
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रविवारी रात्री नऊच्या सुमारास भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री आणखी दोन अपघात झाले. बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ मध्यरात्री टेम्पोने सात वाहनांना धडक दिली, तर अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बातमी वाचा सविस्तर...
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचे खासगीकरण करण्याचा घाट प्रशासनाने घातला असून, एका खासगी विमा कंपनीला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. बातमी वाचा सविस्तर...
अंबाझरी तलाव पोहण्यासाठी सुरक्षित नसतानाही येथे पोहायला येणाऱ्या मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना काही थांबताना दिसत नाही. रविवारी मित्रांसह पोहण्यास आलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. गेल्या ११ महिन्यांतील ही १४ वी घटना आहे .बातमी वाचा सविस्तर...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला कतारमध्ये दिमाखात सुरुवात झाली आहे. कतार स्टेडियमवर फिफा विश्वचषकाचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या स्टेडियमच्या उभारणीत महाराष्ट्रातील नागपूरच्या शाहीद अली या अभियंत्याचा सहभाग होता.
श्रद्धा वालकर खून प्रकरण ताजं असतानाच उत्तर प्रदेशातील आजमगढमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना उघडकीस आली आहे. पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा खून करून तिच्या शरिराचे सहा तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील आरोपी प्रिन्स यादवला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेचा खून करून तिचे अवयव विहिरीत टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रविवारी रात्री नऊच्या सुमारास भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री आणखी दोन अपघात झाले. बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ मध्यरात्री टेम्पोने सात वाहनांना धडक दिली, तर अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.