Maharashtra Politics Updates नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं कुरण आहे. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह जाब विचारणार का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे देवाभाऊच्या जाहिरातीवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग फेकण्यात आला त्या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात पोलिसांना एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या आणि अशा घटनांवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Maharashtra News Live Update : नगरविकास खातं म्हणजे पैसे खाण्याचं कुरण, संजय राऊत यांची टीका; यासह महत्त्वाच्या बातम्या

20:15 (IST) 18 Sep 2025

Gameskraft Layoffs: माजी ‘सीएफओ’ने गंडा घातलेल्या ‘गेम्सक्राफ्ट’च्या कर्मचाऱ्यांवर आता गंडांतर

गेम्सक्राफ्टने नोकरकपातीबाबत म्हटले आहे की, संसदेत नुकतेच ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
20:08 (IST) 18 Sep 2025

पायलट होण्यासाठी मुंबई - पुण्यात जाण्याची गरज नाही; रत्नागिरीत लवकरच सुरु होणार फ्लाईंग क्लब

जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते महसूल विभाग सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सेवा दूत ही सेवा घरपोच देण्याचा उपक्रम, ई-तक्रार निवारण प्रणाली आणि ई – संदर्भ पोर्टल या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कळ दाबून पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ...वाचा सविस्तर
20:00 (IST) 18 Sep 2025

मिरजोळे औद्योगिक वसाहतीत देह विक्रीचा अनैतिक व्यापार; पोलिसांनी छापा टाकत घेतले एका नेपाळी महिलेला ताब्यात...

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील एमआयडीसी भागातील एका प्लॉटमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. ...वाचा सविस्तर
19:56 (IST) 18 Sep 2025

बँकेच्या अ‍ॅप अद्ययावत करून देण्याची बतावणी नागरिकाला दोन लाखांचा गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोमवार पेठेत राहायला असून, १४ सप्टेंबरला सायबर चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधला. ...सविस्तर बातमी
19:52 (IST) 18 Sep 2025

सर्वोच्च न्यायालयानेच धर्मांतराचा अधिकार नाकारला; माजी न्यायमूर्ती म्हणाले, ‘हे बरोबर नाही…’

सर्वोच्च न्यायालयाने १९७७ साली दिलेल्या एका निर्णयात धर्मांतराचा अधिकार नाकारला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी त्या आदेशावर टीका केली आहे. ...वाचा सविस्तर
19:47 (IST) 18 Sep 2025

"तुझ्या एका मुलाखतीमुळे आनंद दिघेंना टाडा लागला, यापुढे तोंड सांभाळून बोलावे", शिंदे गटाच्या खासदाराने दिला इशारा

आनंद दिघे यांनी तुला कशा कशात वाचवलेला आहे हे लोकांसमोर आणू का, अशा शब्दात म्हस्के यांनी राऊत यांच्यावर टिका केली. ...अधिक वाचा
19:45 (IST) 18 Sep 2025

कराड व मलकापूर शहरांचा नमो उद्यान योजनेत समावेश; आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून निधीही मंजूर

राज्यातील शहरी भागात हरित उद्यानांचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने ‘नमो उद्यान योजना’ सुरू केली आहे. त्यासाठी ३९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ‘नमो उद्यान’ साकारण्यासाठी नगरपालिकांना प्रत्येकी एक कोटींचा निधी वितरित केला जाणार आहे. ...अधिक वाचा
19:32 (IST) 18 Sep 2025

चिमुकल्या मुलाला बाजूला ठेवून आईची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, मुलगा सुखरूप…

प्राप्त प्राथमिक माहितीनुसार आज गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी एका महिलेने जलंब रेल्वे स्टेशनवर मालगाडीच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केली. ...वाचा सविस्तर
19:25 (IST) 18 Sep 2025

अंतरवाली सराटीतील हल्ल्यामागे पवारांच्या आमदाराचा हात, भुजबळांचा गंभीर आरोप

शुक्रवारी नागपुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वसंध्येला येथे समता परिषदेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...सविस्तर बातमी
19:20 (IST) 18 Sep 2025

मासे चोरीचा प्रयत्न जीवावर बेतला; नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावापासून १५ किमी अंतरावर असलेल्या खांबाडी शेत शिवारातील नाल्यात मासे पकडण्यासाठी एका व्यक्तीने जाळे लावून ठेवले होते. या अडकलेले मासे चोरण्याच्या हेतूने घनश्याम रामटेके वय ४२ व मिलिंद सुखदेवे ५५ हे नाला परिसरात गेले. ...वाचा सविस्तर
19:19 (IST) 18 Sep 2025

"आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते जिल्हाप्रमुख होते, बाळासाहेबांच्या बाजूला त्यांचा फोटो का?", राऊतांच्या विधानावरुन ठाण्यातील शिवसैनिक संतप्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी एक विधान केले आहे. ...सविस्तर वाचा
18:59 (IST) 18 Sep 2025

काय आहे 'एईएस', नागपुरात आठ रुग्ण आढळले, यंत्रणा अलर्ट

मेंदूच्या आजारावर वेळेत उपचार केले नाही तर जीवाला धोका उद्भवू शकतो, त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एईएसचे रुग्ण आढळताच महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी तातडीने पावले उचलली. ...वाचा सविस्तर
18:45 (IST) 18 Sep 2025

नवीन गोदावरी पाणी लवाद नेमण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा; मराठवाडा अनुशेष निर्मुलनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गोदावरी पाणी लवाद (बच्छावत आयोग) कालबाह्य आणि गैरलागू झाल्यामुळे नवीन लवाद नेमण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांकडे केली. ...सविस्तर बातमी
18:41 (IST) 18 Sep 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, “आनंद दिघेंची थट्टा करतील, त्यांना दिघेच चमत्कार…”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी एक विधान केले आहे. ...वाचा सविस्तर
18:24 (IST) 18 Sep 2025

मलंगगड, नेवाळी परिसरातील बांगलादेशी, तडीपार, गांजा तस्करांवर कारवाई करा, भुमिपूत्र स्वाभिमानी संघाची मागणी

गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी एक संशयित दहशतवाद्याला मलंगगड परिसरातील नेवाळी भागातील भाड्याने राहत असलेल्या एका बेकायदा घरातून अटक करून नेली आहे. ...सविस्तर वाचा
18:20 (IST) 18 Sep 2025

Rift in Mahayuti: पिंपरी- चिंचवड: आगामी महानगरपालिकेत भाजप, राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; महायुतीत फूट!

३१ जानेवारी २०२६ आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात नुकतेच न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशानंतर तरी राज्यात महानगरपालिका निवडणूका पार पडतील अशी आशा स्थानिक नेत्यांना लागली आहे. ...सविस्तर वाचा
18:00 (IST) 18 Sep 2025

पुणे : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अल्पवयीन ठार, मंतरवाडी - हांडेवाडी रस्त्यावर अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि त्याचा मित्र दुचाकीस्वार मोहम्मद खान हे १६ सप्टेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास मंतरवाडी-हांडेवाडी रस्त्यावरून जात होते. ...अधिक वाचा
17:44 (IST) 18 Sep 2025

पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर वार; दोघा आरोपींना अटक, बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ९ सप्टेंबर रोजी पहाटेसाडे वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर थांबले होते. ...वाचा सविस्तर
17:43 (IST) 18 Sep 2025

कारखान्यांच्या उपपदार्थ उत्पन्नातील वाट्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; हंगामाच्या प्रारंभीच साखर सम्राटांच्या कोंडीची शक्यता

यावर्षीच्या ऊस गळीत हंगामाची तयारी साखर उद्योगाकडून सुरू झालेली आहे. यंदा हंगाम लवकर सुरू व्हावा, असाही प्रयत्न सुरू आहे. ...वाचा सविस्तर
17:38 (IST) 18 Sep 2025

सांगलीत श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत ६८१ आरोग्य शिबिरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या श्री गणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात ६८१ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. ...सविस्तर वाचा
17:30 (IST) 18 Sep 2025

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल; पण सहकार खात्याची डोळेझाक ! नांदेड जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून बँकेतल्या नोकरभरतीची ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी त्रयस्थ संस्था नेमण्याच्या प्रक्रियेत गडबड चालल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ...सविस्तर बातमी
17:30 (IST) 18 Sep 2025

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान, म्हणाले, "आघाडीच्या निर्णयाचे अधिकार स्थानिक नेत्यांना"

ठाणे जिल्ह्यातील सात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी संघटनात्मक आढावा बैठक गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
17:00 (IST) 18 Sep 2025

देवरुख येथील केतकर ज्वेलर्सच्या मालकाचे अपहरण; गुन्हा दाखल करत पोलीस तपास सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) यांना बुधवारी रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास साखरपा देवरुख मार्गांवरील वांझोळे पासून एक किलोमीटर अंतरावर अज्ञातांनी लुट करुन अपहरण केले. ...सविस्तर बातमी
16:50 (IST) 18 Sep 2025

सिंधू सरस्वती संस्कृतीचा १०१ वर्षाचा वारसा जाणून घेण्याची ठाणेकरांना संधी

सिंधू सरस्वती संस्कृतीच्या २० सप्टेंबर १९२४ रोजी झालेल्या शोधामुळे भारताला जगाच्या इतिहासात विशेष स्थान मिळाले. ...सविस्तर बातमी
16:39 (IST) 18 Sep 2025

मर्यादित प्रवेशामुळे भाजपाचे प्रमुख पदाधिकारी माघारी ! पालकमंत्री अतुल सावे यांच्या नांदेड दौर्‍यातील प्रकार

दौरा कार्यक्रमानुसार तेथे भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक असल्याचे दिसून आल्यामुळे वेगवेगळ्या भागांतील भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी बुधवारी सकाळी नांदेडमध्ये दाखल झाले. ...वाचा सविस्तर
16:29 (IST) 18 Sep 2025

‘यशवंत’मध्ये एकत्रित पुस्तक वाचनाचा 'अभिनव प्रयोग’ सुरू ! ‘आम्ही वाचतोय; तुम्हीही वाचा’ हा संदेश देण्याचा प्रयत्न

'डिजीटल ओव्हरलोड'च्या सध्याच्या जमान्यात समाज माध्यमांपासून थोडी विश्रांती घेऊन पुस्तकांशी आणि स्वतःशी नातं निर्माण करण्यासाठी यशवंत महाविद्यालयातील 'जेन झी'द्वारे 'यशवंत बुकीज' हा सर्जनशील एकत्रित-वाचन प्रयोग 'हैदराबाद मुक्तिसंग्राम दिना'पासून सुरू करण्यात आला. ...सविस्तर बातमी
16:15 (IST) 18 Sep 2025

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधूभाई कुलकर्णीं यांचे निधन; पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकारणात पाठवण्यात महत्त्वाची भूमिका

मधुभाईंना गुजरातमध्ये प्रांतप्रचारक म्हणून १९८५ मध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी संघ प्रचारक असलेले नरेंद्र मोदींना भाजपमध्ये पाठवले होते. ...सविस्तर वाचा
16:10 (IST) 18 Sep 2025

ठाणे : अनधिकृत शाळेचा मनमानी कारभार !

खोटी प्रमाणपत्र दाखवत, मोठ्या रक्कमेची शालेय शुल्क आकारून अनेक अनधिकृत शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याची प्रकरणे अनेकदा उघड झाली आहे. ...सविस्तर वाचा
16:02 (IST) 18 Sep 2025

Pitru Paksha: पितृपंधरवड्यात अतिवृष्टीमुळे ‘काक’स्पर्शाची पंचाईत

अतिवृष्टीमुळे घाट पाण्याखाली असून कावळयांनीही तात्पुरते स्थलांतर केले आहे. त्यामुळे पिंडदान केल्यानंतर ‘काक’स्पर्शाची पंचाईत झाली आहे. ...सविस्तर बातमी
15:58 (IST) 18 Sep 2025

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरापूर्वी भुजबळांची तोफ धडाडणार, समता परिषदेच्या ओबीसी मेळाव्याचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) चिंतन शिबिराच्या एक दिवसाआधी या पक्षाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांची तोफ नागपुरात धडाडणार आहे. ...सविस्तर बातमी

Sanjay Raut

शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. (PC : RNO)

नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं कुरण आहे. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह जाब विचारणार का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे देवाभाऊच्या जाहिरातीवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.