Article Body Starting : Maharashtra News Today, 08 November 2023 : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. त्याचबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा आमने-सामने आले आहेत. आज दिवसभरात आपल्याला यासंबंधीच्या बातम्या पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. देशपातळीवर याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. यासंदर्भातल्या बातम्याही आज पाहायला मिळतील.
Mumbai Maharashtra News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ऐन दिवाळीच्या तोंडावर ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान प्रवास शुल्क दरवाढ जाहीर केली आहे.
नागपूर: देशभरातील क्रिकेट सट्टेबाजांसाठी नागपूर शहर नंदनवन ठरत असून आयपीएल स्पर्धेच्यावेळी अनेक सट्टेबाज नागपुरात ठाण मांडून बसतात. क्रिकेट सट्टेबाजीत असलेली लाखोंची कमाई बघता नागपूर पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारीही आमिषाला बळी पडले.
नागपूर: मराठा आरक्षणासाठी ओबीसी नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र १ मे १९६० पासून राज्यात अर्धा डझन मुख्यमंत्री मराठा झाले आहे. त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणा संदर्भात ओबीसी नेत्यांना दोष कसा देता येईल असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
बुलढाणा: अपघात हा दुर्देवीच असतो. मात्र कधीकधी वाईटातून चांगले घडते .याचा अनुभव धाड पोलिसांना आला. तिथे झालेल्या अपघातामुळे तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.
नागपूर: उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप कायम असतानाच ‘स्वाईन फ्लू’चाही विळखा घट्ट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील विविध रुग्णालयांत दगावलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’मुळे झाल्याचे मंगळवारच्या (७ नोव्हेंबर) मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत स्पष्ट झाले.
वर्धा: शासकीय कामांचा खाक्या नव्याने सांगण्याची गरज नाही. अर्धवट कामे टाकून दिल्याने नागरिकांना होणारा मनस्ताप नित्याचा. कारंजा घाडगे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला.
आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तिने दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याची मागणी दुकानदाराकडे केली होती.
काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीडमध्ये दगडफेक, जाळपोळीचे प्रकार घडले होते. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी घटनाक्रम जाणून घेत पोलीस तपासाविषयी माहिती घेतली. बीड येथील भाजपा कार्यालय, शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय, जयदत्त क्षीरसागर यांचे निवासस्थान, आमदार प्रकाश सोळंके यांचे निवासस्थान, सुभाष राऊत यांचे हॉटेल या ठिकाणांना पंकजा मुंडे यांनी भेटी दिल्या.
नागपूर: प्रेमविवाहानंतर चार वर्षे सुखी संसार सुरू असताना कौटुंबिक कारणातून पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात पत्नी माहेरी गेली. तिच्या नातेवाईकांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरवले. पत्नीच्या लग्नाची खबर मिळताच युवकाने धावपळ सुरू केली.
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करून पैश्याची मागणी करणाऱ्या एका लाईनमनला शेतकऱ्याने चांगलाच शॉक दिला.
वाहतूक पोलिसांनीच मनपाकडे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याची मागणी केली आहे.
उत्तर दाखल करण्यासाठी दोन वेळा संधी देऊनही सरकारने याचिकेवर उत्तर दाखल केलेले नाही, असे सांगून याचिकाकर्त्यांनी सरकारच्या मागणीला विरोध केला.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही सुविधा ‘आपला दवाखाना’मध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
मराठा आरक्षण आणि कुणबी जातप्रमाणपत्राबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. भुजबळ म्हणाले, एका बाजूने मागच्या दाराने ज्यांना आरक्षण देऊ शकत नाही अशा लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं, ओबीसीमध्ये यायचं आणि दुसऱ्या बाजूने ओबीसीमध्ये आत्ता जे आहेत त्यांना कोर्टात लढून ओबीसीच्या बाहेर ढकलायचं असा दुहेरी कार्यक्रम सुरु आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कायदेशीर लढाई, बाहेरची लढाई सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काय सांगितलं? त्याचा अर्थ तोच होतो ना.. जरांगेंना सर्व प्रकाराचं आरक्षण हवं आहे तेपण ते म्हणतील त्याप्रमाणे ते हवं आहे. एकाला कुणबी प्रमाणपत्र दिलं की बाकीच्यांना द्यावं लागणार. मग सगळे कुणबी झाले की ओबीसीतले त्यांना अधिकार मिळावेत. शिक्षण, नोकरी, राजकीय असे अधिकार त्यात आहेत. ३७५ जाती आहेत त्यात जर ही सगळी मंडळी आली तर कुणालाच काही मिळणार नाही. ओबीसी तर संपूनच जाईल.
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून पिस्तूलचा वापर वाढला होता. चक्क शहरातून २५ हजार रुपयांत पिस्तूलची विक्री केल्या जात होता. नागपूर शहरात आणि अन्य राज्यात अग्निशस्त्राचा पुरवठा करणाऱ्या आरोपीच्या तहसील पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
नागपूर: रेल्वेगाडी ज्वलनशील पदार्थ, वस्तू नेण्यास मनाई असताना फटाके घेऊन प्रवास करणाऱ्या ११ जणांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने कारवाई केली.
साखर कारखान्यांची कर्जे एवढी वाढलेली आहेत की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन म्हणून मला झोपसुद्धा लागत नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
नागपूर: सख्ख्या भावाच्या ८ वर्षीय मुलीवर अमानुष बलात्कार करून काका फरार झाला. ही धक्कादायक घटना कोराडीत घडली. प्रमेश्वर (३४) असे आरोपीचे नाव आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इथोपिया मार्गे टान्झानियाला जाणाऱ्या २६ वर्षीय परदेशी नागरिकाला सीआयएसएफच्या जवानांनी सोमवारी ताब्यात घेतले.
वर्धा: प्राप्त माहिती आधारे वर्धा रेल्वे स्थानकावर रेल तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागपूरच्या सीबीआय पथकास लागली होती. त्यांनी वर्धा रेल्वे पोलीसांची मदत घेत काळाबाजार करणाऱ्या बाबा अभिमान पाटील यास अटक केली आहे.
यवतमाळ: राज्यातील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी २०२३ चे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून शासकीय सुविधांपासून वंचित आहेत. मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नसल्याची बाब काही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणूनही शासनस्तरावर उपाययोजना न झाल्याने विद्यार्थी खिशातून खर्च करत असल्याचे चित्र आहे.
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा खरीप योजनेत शासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एचडीएफसी ॲग्रो पीक विमा कंपनीला दिले आहेत.
नागपूर: ग्राम पंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर लढवली जात नाही. त्यामुळे त्या निवडणुकांचा निकाल आपल्याच बाजूने लागण्याचा दावा करून छाती फुगवण्यापेक्षा हिम्मत असेलतर पराभवाच्या भितीपोटी थांबवून ठेवण्यात आलेल्या महापालिका, नगरपरिषद निवडणुका तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपला आज येथे दिले.
नागपूर: एसटी महामंडळाच्या संघटनांमध्ये आंदोलन पुकारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. प्रथम कामगारांच्या मान्यताप्राप्त संघटनेने आंदोलनाची घोषणा केली, ६ नोव्हेंबरला ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या संघटनेने आंदोलन केले.
ती सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शौचालयात गेली. तेथून नजर चुकवून तिने पलायन केले.
अमरावती: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे, संभाजीनगर, जालना, अहमदनगर या शहरांसाठी ४० तर जिल्हातंर्गत शहरांसाठी विशेष बस धावणार आहेत.
अमरावती: औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे संतापाच्या भरात प्राध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एकीकडे राज्य सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी छगन भुजबळांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू म्हणाले, "मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळेल, कुणबी नोंदी सापडतायत, त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. जे मराठा आहेत, तेच कुणबी आहेत आणि हे १०० टक्के सत्य आहे." छगन भुजबळांबाबत बच्चू कडू म्हणाले, “भुजबळांनी आम्हाला सांगावं की मराठा कुणबी नाही तर कोण आहे? मराठा हा कुणबीच आहे. पण काही लोक मतदानाच्या पेटीचा हिशेब करून हे मुद्दे पुढे करून राजकीय पोळी शेकण्याच्या प्रयत्नात आहेत. ते चुकीचं आहे."
बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ६५ टक्क्यांपर्यंत वाढवली
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जात सर्वेक्षण करून राजकारणाचा एक नवा पायंडा पाडला. नितीश कुमार यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) विधानसभेत राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची इच्छा बोलून दाखविली आणि त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरीदेखील दिली. आता ९ नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव विधानसभेत मांडला जाणार आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण वाढविणार असल्याचे सांगितले.